फैजपूरात कचरा व घाणीचे साम्राज्य बाबत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन इदू पिंजारी फैजपूर (संपादक :- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील प्रत्येक वाड...
फैजपूरात कचरा व घाणीचे साम्राज्य बाबत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील प्रत्येक वाडा गल्लीतील कचरा साफ सफाई करण्यात यावी कारण येत्या दोन तीन दिवसात नवरात्र उत्सवात सुरुवात होणार असून शहरातील स्वच्छता त्वरित करण्यात यावी अशी मागणी प्रांतअधिकारी यांना निवेदनात द्वारे करण्यात आली आहे. न्हावी दरवाजा, पोलीस स्टेशन जवळ, विध्ययावासिनी माता मंदिर पासून खंडेराव मंदिरा रोड ते बस स्टॅन्ड पर्यंत संपूर्ण रस्त्याची साफ सफाई व कचरा उचलण्यात यावा तसेच शकुंतला जिवराम महाजन शाळे जवळ, अंगणवाडी ,मराठी शाळा असून त्या ठिकाणी अत्यंत घाणीचे साम्राज्य आहे. तसेच तूप बाजार, सिद्धमाता मंदिर, लक्ष्मी नगर, लक्कड पेठ, कासार गल्ली, कालिंका माता मंदिर, भवानी माता मंदिर, देवी वाडा अंबिका देवी मंदिर या ठिकाणी शहरात सर्व परिसर कचरा मुक्त करून घाणीचे साम्राज्य उचलून साफ सफाई करण्यात यावी नगर पालिकेला तात्काळ आदेश देण्यात यावे अशी मागणी प्रांत अधिकारी यांना निवेदना द्वारे युवा सेना शहर प्रमुख (उ.बा.ठा) गट भास्कर सोनवणे,उप शहर प्रमुख संदीप माळी,गणेश गुरव सर, तुषार रावते, जितेश सनांसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments