Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाशीम मंगरुळपिर विधानसभा मतदारसंघामध्ये जगदिश मानवतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  वाशीम मंगरुळपिर विधानसभा मतदारसंघामध्ये जगदिश मानवतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल  वाशीम प्रतिनिधी (संपादक :-हेमकांत गायकवाड)     दिनांक 25 /...

 वाशीम मंगरुळपिर विधानसभा मतदारसंघामध्ये जगदिश मानवतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल


 वाशीम प्रतिनिधी

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

    दिनांक 25 / 10 / 2024 वाशीम मध्ये सुप्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे समाजसेवक जगदिश मानवतकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या सह आज रोजी वाशीम येथील तहसील कार्यालय मध्ये आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.जगदिश मानवतकर यांनी 2013 पासुन वाशीम जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कार्याचा आणि अनेक उपक्रमाचा सपाटाच लावला आहे.त्यामुळे जगदिश मानवतकर हे वाशीम मध्ये प्रसिद्ध झाले.त्यामुळेच त्यांची लोकप्रियता पाहून बहुजन भारत पार्टीने त्यांना आपली उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे आज रोजी जगदिश मानवतकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.दाखल करतेवेळी बहुजन पार्टीचे जिल्हा सचिव अक्षय भाऊ इंगोले,जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ पुंडसे,शहर अध्यक्ष रवी भाऊ ठोके , शहर उपाध्यक्ष गौतम भाऊ कांकाळ,वाशीम जिल्हा प्रमुख ऑटो सेल दिपक हजबे ,अब्दुल एजाज,बहुजन भारत पार्टीचे महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई भगत,राहुल ठोके ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे राजकुमार पडघान साहेब यांची उपस्थिती यावेळी होती.

No comments