आडगाव विरवाडे चोपडा रस्त्यावर घाणीमुळे वाहतुकी ला अडथळा व प्रदूषण चोपडा ( प्रतिनिधी) रविंद्र कोळी (संपादक :- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्...
आडगाव विरवाडे चोपडा रस्त्यावर घाणीमुळे वाहतुकी ला अडथळा व प्रदूषण
चोपडा ( प्रतिनिधी) रविंद्र कोळी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील आडगाव विरवाडे चोपडा रस्त्यावर एम.आय.डी.सी. तील काही मिल धारक आपल्या मिल मधील काही वेस्टेज घाण आणून ती रस्त्याच्या कडेला आणून टाकतात यामुळे वाहतुकीला अडथळा येत असून दुर्गंधी व प्रदूषणाचा त्रास पादचाऱ्यांना होत आहे अशी तक्रार आडगाव ग्रामपंचायत तिने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
आडगाव विरवाडे चोपडा रस्त्यावर जिनिंग प्रेसिंग मिल, व शहरातील काही कांद्याचे व्यापारी सडलेले कांदे व टरफले या रस्त्यावर आणून टाकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण तर होतेच शिवाय वाहतुकिला देखील अडथळा होतो . या रस्त्यावरून जाताना पादचाऱ्यांना अक्षरशः नाक दाबून घ्यावे लागते. तहसीलदार यांनी यासंदर्भात मील मालकांना व प्रदूषण करणाऱ्या व्यापाऱ्यांना समज घालावी अशी मागणी आडगाव ग्रामपंचायत एका निवेदनाद्वारे दिली आहे.निवेदन देताना आडगाव गावाचे सरपंच भरती बाई भील व उप सरपंच प्रताप अण्णा ग्राम पंचायत सदस राजु बापू विलास बापू लाडलीकर दादा संभाजी पाटील प्रवीण पाटील दुर्गादास पाटील संदीप पाटील मच्छिंद्र पाटील वसंत बापू व आडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments