✨📢📢वराड येथे समुदाय जनजागृती कार्यक्रमातून सुरक्षित मातृत्वाच्या संदेश..🤱 चोपडा प्रतिनिधी (संपादक :-हेमकांत गायकवाड) आज दि- 04/10/2024 ...
✨📢📢वराड येथे समुदाय जनजागृती कार्यक्रमातून सुरक्षित मातृत्वाच्या संदेश..🤱
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
आज दि- 04/10/2024 रोजी वराड या गावात समुदाय जनजागृती कार्यक्रम(Community awarness activity) घेण्यात आला. या कार्यक्रमात गावातील पोलीस पाटील प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत सदस्य व प्रतिनिधी . आपल्या प्रोजेक्ट चे Counsellor- ज्ञानेश्वर सोनवणे व CN- हितेंद्र माळी व गावातील आशा सेविका - बबीता ताई आणि महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती.
सर्वप्रथम हितेंद्र माळी सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली त्यात त्यांनी आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर या संस्थेच्या आपल्या भागात सुरू असलेल्या AMPLI-PPHI प्रकल्पाची थोडक्यात माहिती सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली पुढील कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती ज्ञानेश्वर सोनवणे सर यांनी गावातील लोकांना दिली.. सुरक्षित बाळंतपणासाठी प्रसूतीपूर्व तसेच बाळंतपणा दरम्यान महिलेची ( ANC मातेची) घ्यावयाची काळजी व त्याबाबतचे उपयोजन याबद्दल लोकांना सविस्तर माहिती दिली . तसेच गर्भवती महिलेला सुरक्षित बाळंतपणासाठी मिळणाऱ्या सरकारच्या योजना -
1. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
2. माहेरघर योजना
3. बुडीत मजुरी योजना
या योजनाबाबतीत सविस्तर माहिती दिली तसेच गावातील लोकांना आरोग्य विषयीच्या असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या चोपडा तालुक्याचे आरोग्य दूत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे नवनवीन आरोग्य जनजागृती कार्यक्रम गाव पातळीवर तसेच पाड्यांवर वस्त्यांवर राबविले जात आहेत या कार्यक्रमाला गावातील लोकांचा तसेच नवदुर्गा मित्र मंडळ, वराड यांचे देखील अनमोल सहकार्य लाभले धन्यवाद
No comments