Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांना कारवाई करण्याचे दिले आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांना कारवाई करण्याचे दिले आदेश  भुसावळ प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड)   भुसावळ शहर...

जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांना कारवाई करण्याचे दिले आदेश 



भुसावळ प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

 भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या मधुर वाइन शॉप मध्ये एक अल्पवयीन मुलगा दारू विक्री करीत असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव व राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली होती. त्या अर्जाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी राज्य उत्पादन शुल्क जळगाव कार्यालयाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील जामनेर रोडवर असलेल्या मधुर वाइन शॉप मध्ये एक अल्पवयीन मुलगा कामाला असून तो दारूची विक्री करीत असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना दिसून आल्याने त्याबाबत सानप यांनी १४ ऑक्टोबर २४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या पत्राची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असे पत्र केदारनाथ सानप यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २२ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले आहे.

No comments