adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भवानी पेठ दुर्गोत्सव मंडळातर्फे दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सन्मान

  भवानी पेठ  दुर्गोत्सव मंडळातर्फे दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सन्मान             रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी  (संपादक :- हेमकांत ...

 भवानी पेठ  दुर्गोत्सव मंडळातर्फे दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सन्मान     


    

  रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 सध्या नवरात्र उत्सव सर्वत्र जोरदार सुरू असून ठीक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. 

 न्हावी दरवाजा जवळील  भवानी पेठ दुर्गोत्सव मित्र मंडळांनी  दहावी बारावी मध्ये यश संपादन केलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना  प्रमाणपत्राचे वाटप बुधवारी संध्याकाळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. 


 विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी  ठेवून सखोल अभ्यास केल्यास  यश नक्कीच मिळते. यश संपादन करून आई-वडिलां सह गुरुजनांचे नाव आपण उंचावर नेण्याचे प्रयत्न करावा. अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा जोमाने आपण अभ्यास करावा असे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी यावेळी मनोगत करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे पदाधिकारी  महिला पुरुष भावी भक्तगण  यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले 



 या विद्यार्थ्यांचा झाला प्रमाणपत्र देऊन सन्मान 

 पल्लवी कोळी, गायत्री  गुरव, सृष्टि कोचुरे 

कोमल कोळी, कीर्ती सोनार, दिव्या  गुरव

पुनम कोळी, तन्मय  कोळी, हर्षल कपले 

हरिश  चौधरी, सोहम खेवलकर, मोहित  रावते

, हर्षल  रावते, किरण  कोळी

No comments