Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलिसांन कडून कारवाई

  चोपडा येथे सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलिसांन कडून  कारवाई  चोपडा प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड  दिनांक २४/१०/२०२...

 चोपडा येथे सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलिसांन कडून  कारवाई 


चोपडा प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

दिनांक २४/१०/२०२४ रोजी ००.३० वा. सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, श्री महेश्वर रेड्डी साो. यांनी नाकाबंदी करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत या प्रमाणे पोलीस निरीक्षक, मधुकर साळवे, चोपड़ा शहर पोलीस स्टेशन यांनी व त्यांचे सोबत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

१). दिनांक २४/१०/२०२४ रोजी ००.३० वाजता तिरंगा चौक, चोपडा येथे होंडाई व्हेन्यू कंपनीची गाडी क्रमांक MP ०१ CK ७४७४ हिच्या मध्ये ३०,००,००० रुपये (५०० रुपये दराचे १५, लाख रुपये, २०० रुपये दराचे ६ लाख रुपये, १०० रुपये दराचे ९, लाख रुपये) असे इसम नामे. (१) इम्रान अल्लाउददीन मन्सुरी वय ४४ रा. बलवाडी ता. बरला जि. बडवाणी मध्यप्रदेश (२) अजय अरुण पाटील वय ३२ रा. जयहिंद कॉलनी चोपडा असे वरील रक्कम बलवाड़ी कडून जळगाव कडे चोपडा मार्ग जात असतांना तिरंगा चौकात श्रीनाथ प्राईड हॉटेल समोर मिळून आले आहेत.तर २). दिनांक २३/१०/२०२४ रोजी २०.३० वाजता चोपडा ते शिरपुर रोडवर अकुलखेडा जवळ बंद टोल नाक्याजवळ आरोपी नामे आकाश गणेश चव्हाण वय २४ रा. तळेगाव दाभाळे पुणे ह.मु. वाल्मीक नगर, पनवेल, हा आपले ताब्यातील मोटर सायकल क्रमांक MH १४ KL. ४३०३ (५०,००० रु. कि.ची) हिच्यावर २५,०००/- किमतीचा गावटी बनावटीचे पिस्टल (कट्टा) सिल्वर रंगाचा व २०००/- किमतीचे पिवळसर धातुचे ०२ जिवंत काडतुस मिळून आल्याने चोपडा पो.स्टे. ला गुरनं. ५३७/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५ सह मुंबई पोलीस अॅक्ट १३५ प्रमाणे गुन्हा दिनांक २४/१०/२०२४ रोजी ०१.१४ वाजता दाखल तर ३). दिनांक २४/१०/२०२४ रोजी पहाटे ०३.०० वा.चे सुमारास मोहंमद कादीस शेख आयुब वय ३८ रा. के.जी.एन. कॉलनी, नायरा पेट्रोलपंपाच्या मागील गल्लीमध्ये राहत असलेल्या घराचे बाजुस अससलेल्या गोडावून वजा दुकानामध्ये महाराष्ट्र शासनाने अधिसुचना क्र. असुमाआ/५८१/२०२४/७, दि. १२/०७/२०२४ अन्वये महाराष्ट्र राज्यात उत्पादन, वितरण व साठयास प्रतिबंध असलेला १,८७,३८० रुपये किंमतीचा पान मसाला/सुगंधीत तंबाखु/जर्दा सदृष्य मालाचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने तसेच सदर साठा हा मानवी शरीरास अपायकारक व हानिकारक असल्या चे माहित असतांना सुध्दा स्वतःचे आर्थिक फायदयासाठी साठा व विक्री करतांना मिळून आला आहे. सदर प्रकरणी चोपडा पो.स्टे. ला गुरनं. ५३८/२०२४ BNS कलम १२३,२७४,२७५,२२३ प्रमाणे दिनांक २४/१०/२०२४ रोजी ०५.१५ वा. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मा. श्री. महेश्वर रेडडी, मा.पोलीस अधिक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर (पवार) अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव भाग तसेच मा. श्री. आण्णासाहेब घोलप, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा भाग, उपविभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे, सपोनि श्री. एकनाथ भिसे, पोउनि श्री. अनिल भुसारे, पोउनि श्री. जितेंद्र बल्टे, पोउनि श्री. विजय देवरे, पोउनि श्री. योगेश्वर हिरे, सपोउनि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेकों शिपी, पोहेको ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोको प्रकाश मथुरे, पोकों प्रमोद पवार, पोर्को विनोद पाटील, पोकों अमोल पवार, पोकों मदन पावरा, पोको रजनिकांत भास्कर, पोकों अक्षय सुर्यवंशी, पोकों समा तडवी यांनी सदरची कारवाई केली .

No comments