चोपड्यात आजपर्यंत ५६ नामनिर्देशनपत्रांचे वितरण चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्...
चोपड्यात आजपर्यंत ५६ नामनिर्देशनपत्रांचे वितरण
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी चोपडा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी २८ नामनिर्देशन पत्र वितरण करण्यात आली असून. तेरा उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनीना २८ अर्ज वितरीत केले आहेत.
तर दुसऱ्या दिवशी २३/१०/२०२४ रोजी आठ उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना १६ अर्ज वितरीत करण्यात आले आहेत. एकूण ४४ अर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत.
तिसऱ्या दिवशी १२ नामनिर्देशन पत्र वितरण करण्यात आली आहे. चार उमेदवारांचे १२ अर्ज वितरीत करण्यात आले आहेत.
तर तिसऱ्या दिवशी एकूण ५६ अर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत.
प्रशासनाच्या वतीने नामनिर्देशन पत्रांच्या वितरणासाठी आणि स्वीकृतीसाठी तयारी पूर्ण केली असून उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना कमीत कमी वेळात नामनिर्देशन पत्र दाखल करता यावे अशी यंत्रणा राबविण्यात आली आहे.
No comments