देवमोगरामाता आदिवासी गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना चेअरमनपदी संजीव शिरसाठ, व्हाइस चेअरमनपदी गणदास बारेला तर सचिवपदी शीतल पावरा चोपडा...
देवमोगरामाता आदिवासी गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना
चेअरमनपदी संजीव शिरसाठ, व्हाइस चेअरमनपदी गणदास बारेला तर सचिवपदी शीतल पावरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील गरीब जनतेच्या उद्धारासाठी उनपदेव येथे देवमोगरा माता आदिवासी गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. आ. लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकात सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी समाजसेवक संजीव शिरसाठ, देवसिग पावरा यांनी सहकार्य करुन ही संस्था रजिष्टर केली. या संस्थेच्या अध्यक्षपदी संजीव शिरसाठ यांची तर सचिवपदी शीतल देवसिंग पावरा यांची निवड करण्यात आली आहे. ही संस्था परिसरातील पाड्या, वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. देवमोगरा माता आदिवासी गृहनिर्माण सहकरी संस्थेच्या उनपदेव (अडावद) येथील संस्था परिसरातील शेवरे, धुपामाय, शेवरेपाडा, पांढरी, वनगाव, रामजी पाड्यासह आदिवासी समाजाला भविष्यात वरदान ठरेल, असे या वेळी सांगण्यात आले. या वेळी संस्थापक चेअरमनपदी संजीव पांडूरंग शिरसाठ,व्हा चेअरमनपदी गणदास सुरभान बारेला, सचिवपदी शीतल देवसिंग पावरा, सदस्य रायसिंग पावरा, नसबाई पावरा, नानीबाई पावरा, पन्नालाल बारेला, देवसिंग पावरा, रमेश बारेला, दिलीप बारेला, भाया पावरा, बायजाबाई पावरा, जेकला पावरा, बालसिंग बारेला, रामसिंग बारेला यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आ. लता सोनवणे, प्रा. चंद्रकांत सोनवणे, भावना माळी, पी. आर. माळी, भूषण पाटील, सचिन महाजन, तितऱ्या बारेला, जावेदखा पठाण, प्रताप पावरा, प्रल्हाद पावरा, ताराचंद पाडवी, गुलाब पावरा, विनेश पावरा, शोक पावरा, दिनेश बारेला, खेलसिंग बारेला, भिमसिंग पावरा, अनिल पावरा, लालू बारेला, दिलीप पावरा, मदन पावरा, मेहंड्या पावरा, जतन पावरा, अलका पावरा, सुरेश पावरा, दिनेश बारेला, प्रताप बारेला, संजय बारेला, सागर पावरा, सायसिग बारेला, खुमसिंग बारेला, बाटा बारेला, गजिराम पावरा, गाठ्या बारेला, राकेश बारेला, ताराचंद बारेला, नानसिंग पावरा, अनिता पावरा, आशाबाई पावरा, बादशाह बारेला, जगदिश बारेला, राजेश बारेला, बायसिबाई बारेला यांनी कौतुक केले आहे.
No comments