भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निर्मल बोरा तर सचिवपदी दर्शन देशलहरा यांची निवड चोपडा ( प्रतिनिधी) ---- (संपादक:- हेमकांत गायकव...
भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी निर्मल बोरा तर सचिवपदी दर्शन देशलहरा यांची निवड
चोपडा ( प्रतिनिधी) ----
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
भारतीय जैन संघटनेचे राज्यअध्यक्ष केतनभाई शहा व राज्य सचिव दीपकभाऊ चोपडा यांचे नुकताच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतांना चोपडा येथे चोपडा धावती भेट दिली होती त्यावेळी जळगावच्या जिल्हा अध्यक्षपदी चोपडयातून असयाला हवा असे नवनिर्वाचित राज्यअध्यक्ष व सचिव यांनी इच्छा व्यक्त केली होती. तद्नंतर चोपड्यातून जिल्हाअध्यक्ष म्हणून निर्मल बोरा,तर सचिव म्हणून दर्शन देशलहरा यांची एकमताने निवड करून नावे पाठविण्यात आले होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे कार्यकारणी विनय पारख, अशोक श्रीश्रीमाळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमी मिळत असते नूतन विभागीय अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांचे मार्गदर्शन लाभणार असून पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. निर्मल बोरा, दर्शन देशलहरा यांच्या निवडीच्या जिल्ह्याभरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा भरातून लवकरच जिल्हा कार्यकारिणी घोषित करणार असल्याचे देखील निर्मल बोरा यांनी सांगितले संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मूथ्था, नूतन राष्ट्रीय अध्यक्ष नंदुभाऊ साखला यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
No comments