महाराष्ट्र कोळी समाज संघ मलकापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सपकाळ तर नांदुरा तालुका संघटक पदी जानराव विटोकार यांची नियुक्ती जाहीर अमोल बावस्का...
महाराष्ट्र कोळी समाज संघ मलकापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सपकाळ तर नांदुरा तालुका संघटक पदी जानराव विटोकार यांची नियुक्ती जाहीर
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- आदिवासी कोळी महादेव जमातीच्या न्याय हक्कासाठी व जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन असलेल्या महाराष्ट्र कोळी समाज संघ विदर्भ अध्यक्ष दीपकभाऊ वाघ,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष किशोर नेवरे यांचा मार्गदर्शनाखाली तसेच युवा जिल्हा अध्यक्ष अमोल बावस्कार यांच्या सेवाकार्यावर विश्वास ठेऊन आज जिल्हा युवा कार्याध्यक्ष शुभम घुले,मलकापूर तालुका अध्यक्ष वासुदेव सोनोने यांचा हस्ते कोळी महादेव जमातीच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारे समाजसेवी संदीप सपकाळ यांची मलकापूर तालुका उपाध्यक्ष पदी तर जानराव विटोकार यांची नांदुरा तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.आदिवासी कोळी महादेव जमातीच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्व मलकापूर तालुक्यातील युवा वर्गाणी लढा देण्यासाठी एकत्र यावे असे संदीप सपकाळ यांनी जमातीला आव्हान केले.

No comments