adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवैध गावठी दारुभट्ट्यांवर वनविभागाची कारवाई

  अवैध गावठी दारुभट्ट्यांवर वनविभागाची कारवाई बिडगाव ता.चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) आज रोजी दुपारी वनपरिक्षेत्र चोपडा अंतर्ग...

 अवैध गावठी दारुभट्ट्यांवर वनविभागाची कारवाई


बिडगाव ता.चोपडा प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

आज रोजी दुपारी वनपरिक्षेत्र चोपडा अंतर्गत नियतक्षेत्र सत्रासेन उ. कक्ष क्र.२७९ मध्ये पिपऱ्यापानी नाला परिसरामध्ये अवैध दारु हातभट्टीवर आज अचानक धाड टाकून तेथील १००० लिटर दारूचे कच्चे रसायन व दारू पाडण्याचे साहित्य असे ऐकून अंदाजे ५०००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला.


सदरचे घटनेचा वनगुन्हा नोंदवला असुन आरोपींचा शोध सुरु आहे. सदरील कारवाई ही मा. वनसंरक्षक धुळे वनवृत्त श्रीमती निनु सोमराज मॅडम, मा.उप वनसंरक्षक यावल वन विभाग श्री. जमीर शेख सो, मा. विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे श्री. राजेंद्र सदगिर सो. यांचे मार्गदर्शनाखाली. श्री. प्रथमेश हाडपे (सहाय्यक वनसंरक्षक चोपडा), श्री. बी. के. थोरात (वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा) यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

या कारवाईत वनपाल श्री आर.एस. मोरे, श्री जे. पी. सूर्यवंशी, श्री पी. ए. सोनवणे, वनरक्षक श्रीमती सीमा भालेराव. सरला भोई. सोनाली पावरा. उज्वला बारेला. अनिता पिंकी कोठारी.श्री. शालिग्राम कंखरे, रोहित पावरा, संदीप पावरा, जनार्दन गुट्टे, ओमल पाटील, प्रवीण बागुल, शुभम पाटील, प्रकाश पाटील, वनसेवक भुरसिंग पावरा, रतिलाल भिल, रवी भिल, विकी राजपूत, वाहन चालक गोविंदा चौधरी, मनोज मोरे इ. कर्मचारी कारवाईत सहभागी होते.

No comments