देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावेत, महर्षी व्यासदेवाला साकडे...! शब्बीर खान यावल (संपादक. :-हेमकांत गायकवाड) राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडीना व...
देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावेत, महर्षी व्यासदेवाला साकडे...!
शब्बीर खान यावल
(संपादक. :-हेमकांत गायकवाड)
राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडीना वेग आलेला असताना यावल येथीलभाजपा पदाधिकारी व महिलांनी मा. ना देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ ) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी यावल शहरातील महर्षी व्यास मंदिरामध्ये महिला व भाजपा पदाधिकारी यांनी देवाला साकडे घातले. यावेळी भाजपा यावल शहर महिला,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाआरती केली. आमच्या लाडक्या भाऊरायाला अर्थात मा. देवेंद्रजी फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी माझ्यासह भाजपा तालुका अध्यक्ष श्री. उमेश फेगडे, किशोर कुलकर्णी, श्री.तेजस पाटील शहर अध्यक्ष राहुल बारी, श्री अजय फेगडे सर सौं नंदाताई महाजन श्री. भूषण फेगडे, श्री योगेश चौधरी, बबलू घारू,श्री अतुल चौधरी, सागर चौधरी, यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments