कोरपावली येथे श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ पारायण चे आयोजन शुक्रवार पासून इंदू पिंजारी फैजपूर (संपादक :-हेमकांत गायकवाड) - येथून जवळ...
कोरपावली येथे श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ पारायण चे आयोजन शुक्रवार पासून
इंदू पिंजारी फैजपूर
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
- येथून जवळच असलेल्या कोरपावली येथे श्री स्वामीनारायण मंदिर द्वारा आयोजित श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ पारायण चे आयोजन दि.२९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. कथेचे वक्ता श्री प पू शास्त्री श्री भक्तीस्वरूपदासजी आहेत. हा सप्ताह मालतीबाई व नथू रामदास नेहेते यांच्या मोक्षार्थ आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे यजमान देवेंद्र नथू नेहेते व उमेश नथू नेहेते व संपूर्ण नेहेते परिवार कोरपावली हे आहेत.कथेची वेळ सकाळी आठ ते अकरा व दुपारी तीन ते सहा राहणार असून हा सप्ताह डी एच जैन विद्यालय कोरपावलीच्या भव्य प्रांगणात होणार आहे. कथेची रूपरेषा पुढील प्रमाणे- दि.२९ नोव्हेंबर रोजी कथा प्रारंभ गोकर्ण कथा व शुकदेव जी परीक्षित मिलन, दि.३० नोव्हेंबर रोजी ध्रुव चरित्र, दि.१ डिसेंबर रोजी वामन जन्म (बळी यज्ञ), प्रल्हाद चरित्र ( नृसिंह प्रागट्य ), दि.२ डिसेंबर रोजी राम जन्म व कृष्णजन्म, दि.३ डिसेंबर रोजी शिव आगमन, दधिमंथन व गोपाळकाला,दि.४ डिसेंबर रोजी रासोत्सव रुक्मिणी विवाह, दि.५ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दहा सुदामा पोहे कथा समाप्ती, दुपारी बारा वाजता महाप्रसाद व संध्याकाळी पाच ते सात नगरप्रदक्षिणा असा कार्यक्रम आहे.
No comments