हातेड खुर्द येथे वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने रात्री घरापासून तर मंदिरापर्यंत पणत्या लावत दिपोत्सव साजरा शामसुंदर सोनवणे :- हातेड/चोपडा (स...
हातेड खुर्द येथे वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने रात्री घरापासून तर मंदिरापर्यंत पणत्या लावत दिपोत्सव साजरा
शामसुंदर सोनवणे :- हातेड/चोपडा
(संपादक हेमकांत गायकवाड)
हातेड खुर्द येथे शिव जी व विष्णू जी भेटीसाठी महिलांनी केला दिपोत्सव याबाबत अधिक माहिती अशी की आज दि १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजेपासून रात्री उशिरापर्यंत महिलांनी प्रत्येक घरापासून तर महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, एकविरा आई देवी मंदिर येथे एक एक दिवा लावत दिपोत्सव साजरा करण्यात आला आजच्या दिवसाचे महात्म्य महिला वर्गाला विचारले असता भाऊबीज झाली की अनेकांना वाटते की दिवाळी संपली. मात्र असे अजिबातच नसते.
भाऊबीजेनंतर मध्ये मध्ये काही महत्वाचे सण दिवस साजरे केले जातात. कार्तिकी एकादशी झाली की लगेच येते ती वैकुंठ चतुर्दशी. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा वैकुंठ चतुर्दशी १४ नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते.
या दिवसाचे देखील एक वेगळे महात्म्य आणि इतिहास आहे. नक्की वैकुंठ चतुर्दशीला काय करतात?, वैकुंठ चतुर्दशीचे महत्व काय असते? आदी सर्वच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी संपेल.
तर १४ नोव्हेंबर ला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा हर हरेश्वर भेट म्हणून साजरा केला जातो. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या चातुर्मासामध्ये सृष्टीचे पालनहार विष्णू शेषावर झोपी जातात. त्यानंतर त्यांचे पालनकर्त्याचे काम भगवान विष्णू यांच्या अनुपस्थितीमध्ये भगवान शंकर बघतात. या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात अशी मान्यता आहे.
याच वैकुंठ चतुर्दशी या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. हीच भेट या दिवशी साजरी होते आणि हेच या वैकुंठ चतुर्दशीचे वैशिष्ट्य असते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी चार महिने चालणाऱ्या चतुर्मासाची समाप्ती होते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि श्री विष्णूची एक हजार नावे घेऊन विष्णूला बेल आणि शंकराला तुळस वाहून पूजा केली जाते. हाच एक दिवस असतं जातो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मंदिरांमध्ये आणि घरी देखील रात्री ही पूजा केली जाते. ॐ वैकुंठ चतुर्दशीच्या दिवसाची अजून एक परंपरा आहे, जी बऱ्याच ठिकाणी पाळली जाते. ती म्हणजे, महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करणे अतिशय चांगले समजले जाते.
सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणाऱ्यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्द केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते. विशेष म्हणजे प्रत्येक घरापासून दूर लांबच लांब रांगा लावत महिलांनी थेट मंदिरापर्यंत दिवे लावत एक आगळावेगळा दिपोत्सव साजरा केल्यामुळे एक नेत्रदीपक असा क्षण पाहण्यासाठी मिळाला लहान मुलांन पासुन थोरामोठ्यांच्या या श्रध्देत एक वेगळा आनंद पहाण्यास मिळाला यानंतर महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, एकविरा आई देवी मंदिर इ.मंदिरांवर ही पणत्या लावून महादेव मंदिरावर श्री शिवाय नमस्तुभ्यंम् हा अखंड मंत्र जप करत हर हर महादेव, लक्ष्मीपति श्रीहरी विष्णू यांची आराधना करण्यात आली







No comments