adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाशिम मंगरूळपीर मध्ये मतदारांचा जगदीश मानवतकर यांना प्रचारादरम्यान वाढता प्रतिसाद.....

  वाशिम मंगरूळपीर मध्ये मतदारांचा जगदीश मानवतकर यांना प्रचारादरम्यान वाढता प्रतिसाद..... वाशीम प्रतिनिधी :- (संपादक:- हेमकांत गायकवाड) वाशिम...

 वाशिम मंगरूळपीर मध्ये मतदारांचा जगदीश मानवतकर यांना प्रचारादरम्यान वाढता प्रतिसाद.....


वाशीम प्रतिनिधी :-

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

वाशिम . स्थानिक वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध समाजसेवक जगदीश मानवतकर यांना वाशीम मंगरूळपीर मध्ये मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. सविस्तर वृत्त असे की,  वाशिम मंगरूळपीर मध्ये जगदीश मानवतकर 34 - वाशिम विधानसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. अनेक  गावांमध्ये ते भेटी देत असताना त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे . वाशिम मंगरूळपीर मधील जवळपास सर्वच गावांमध्ये ते पोहोचले आहेत. सर्वच गावांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.


या मतदारसंघात त्यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत . त्याचबरोबर ते सतत जनसेवेत राहत असतात . त्यामुळे त्यांनी यंदाच्या विधानसभेमध्ये उभे राहण्याचा निश्चय केला असता त्यांना अनेक गावांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे . बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वेंकटेश कसबे साहेब यांनी त्यांना बहुजन भारत पार्टीची उमेदवारी देऊन त्यांना या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे .सामान्य घरातून आलेले उच्चशिक्षित अभ्यासू आणि हाडामासाचे समाजसेवक असणारे व्यक्तिमत्व वाशिम मंगरूळपीर विधानसभेला या निवडणुकीत लाभेल . असा आशय वाशिम मंगरूळपीर मतदातांराकडून करण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत वाशीम मंगरूळपीर विधानसभेमध्ये दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.  परंतु यंदा बाजी फक्त जगदीश मानवतकर मारतील असा आशय वाशिम मंगरूळपीर  विधानसभेतील मतदारांकडून बोलल्या जात आहे. त्यामुळे वाशीम मंगरूळपीर विधानसभेत बहुजन भारत पार्टीचे अधिकृत उमेदवार तथा ऑल इंडिया ब्लू टायगर सेना पुरस्कृत उमेदवार जगदीश मानवतकर हे उमेदवारी मारतील का ? असा प्रश्न वाशिम मंगरूळपीर विधानसभेतील मतदारांकडून बोलल्या जात आहे.  त्यामुळे ही निवडणूक एन रंगात  येईल आणि कोणाची नशीब खुलेल याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे  . तरी जगदीश मानवतकर हे निवडनुक जिंकतील असा आशय वाशिम मंगरूळपीर विधानसभेतील मतदारांकडून बोलल्या जात आहे. तरी जगदीश मानवतकर यांना वाढता प्रतिसाद या वाशिम मंगरूळपीर  विधानसभेत अनेक गावांमध्ये मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मध्ये जनशक्ती जिथे आणि जनशक्ती ही जगदीश मानवतकर यांच्याकडून कल देईल असा आशय मतदारांकडून बोलल्या जात आहे.

No comments