Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये संविधान दिन साजरा

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये संविधान दिन साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड  (संपादक :-हेमकांत गायकवाड) मुक्ताईन...

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये संविधान दिन साजरा


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड 

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे साजरा करण्यात आला संविधान दिन तथा 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई वरील हल्ल्यातील शहीद जवानांना करण्यात आले विनम्र अभिवादन. 

आज 26 नोव्हेंबर 2024, म्हणजे संविधान दिन याचे औचित्य साधत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या द्वारा

 सामूहिक रित्या संविधानाच्या उद्देशिकेचे करण्यात आले पठण.


या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक व्ही . के. वडस्कर शाळेचे सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख तुषार पाटील,  शुक्लोधन बोदडे  कार्यक्रम व्यवस्थापक स्वप्निल चौधरी, अमोल सुतार, सूत्रसंचालिका प्राजक्ता भंगाळे मॅडम व इतर सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह उपस्थितीत पुष्पमाला अर्पण करण्यात आली तथा संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक पठण करण्यात आले. 

संविधान हा भारतीय न्यायव्यवस्थेचा आणि समाज व्यवस्थेचा न्यायाधीष्टीत प्रमुख आधार स्रोत आहे, संविधाना विना भारतीय न्यायव्यवस्थेची कल्पना सुद्धा करणे अशक्य आहे जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सातव्या क्रमांकावर असलेल्या तथा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बलाढ्य देशाच्या सामाजिक व्यवस्थेची व न्याय प्रणालीची संपूर्ण व्यवस्था केवळ भारतीय संविधानानेच नियंत्रित व सुव्यवस्थित करण्यात येऊ शकते; भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित अशी राज्यघटना आहे म्हणूनच ही राज्यघटना भारतीय न्यायव्यवस्थेचा व समाज व्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून ओळखली जाते समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, नागरिकांच्या वास्तव्यापासून तर अधिकार व कर्तव्यांपर्यंत सर्व समावेशक असलेल्या न्याय प्रणालीची निर्मिती अथक प्रयत्नांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा इतर  संविधान समितीच्या सदस्यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या मानव गाथेचे आपण सर्वांनी मनोभावे अनुसरण व संरक्षण केले पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केलेत तथा इयत्ता सातवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती व बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सहशिक्षक स्वप्निल चौधरी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना मंत्रमुग्ध केले अशा प्रकारे या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे सहशिक्षक वैभव पाटील यांच्या सांगतेने झाले.

No comments