आज संवाद सत्रात चित्रकार सुनिल दाभाडे सृजन - ३ शिबिरार्थींना तालखेडा येथे करतील मार्गदर्शन चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) ...
आज संवाद सत्रात चित्रकार सुनिल दाभाडे सृजन - ३ शिबिरार्थींना तालखेडा येथे करतील मार्गदर्शन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
कुमारवयीन मुला मुलींना ' स्व ' ची जाणीव करून देऊन त्यांच्या ' स्व ' ला कुटुंब , समाज व विश्वाच्या विस्तीर्ण ' स्व ' सोबत जोडण्यासाठी रचनात्मक व नियोजनबद्ध कार्य करीत असणाऱ्या ' सृजन टीम ' तर्फे सृजन - ३ शिबिर दि . ५ ते १० नोव्हेंबर २०२४ रोजी मानवता फॉर्म , तालखेडा, ता.मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.शिबिराच्या संवाद सत्रात आज शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ .४५ ते ११ .१५ या कालावधीत मानवसेवा विद्यालय , जळगाव येथील सुप्रसिद्ध कलाशिक्षक सुनिल दाभाडे सर ' कलेद्वारे जीवनाच्या अभिव्यक्तीची गोष्ट ' या विषयानुसार शिबिरार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. सदरहू मार्गदर्शनात सुसंवाद , ' स्व ' - जाणिव , संवेदनशीलता , रसिकता , सौंदर्यदृष्टी , कुतूहल , श्रमप्रतिष्ठा , निसर्गप्रेम , जीवनाविषयी प्रेम , स्वावलंबन , सहजता ही मूल्ये तथा विचार ते मनोरंजनातून प्रबोधन करीत विद्यार्थ्यांच्या मनोभूमीत रुजवणार आहेत.असे एका निमंत्रण पात्रिकेन्वये आयोजक योगेश जवंजाळ व प्रशांत ढेंगे यांनी कळविले आहे . चित्रकार सुनिल दाभाडे यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया व मानद सचिव विश्वनाथ जोशी व सर्व पदाधिकारी सदस्य, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी सहकारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच निवृत प्राथमिक शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड आप्पासाहेब, निवृत माध्यमिक शिक्षणाधिकारी हिगोणेकर साहेब, निवृत्त उपशिक्षणाधिकारी नेटकर साहेब उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे,जनमत प्रतिष्ठानाचे अध्यक्ष पंकज नाले यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
No comments