Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुकीनदीच्या पात्रतून बेशुमार अवैध वाळू,खरवा,माती वाहतूक

  सुकीनदीच्या पात्रतून बेशुमार अवैध वाळू,खरवा,माती वाहतूक    रावेर तालुक्यातील चिनावल,पाल,निंभोरा दसनूर,बलवाड़ी,सिंगत  नदी पात्रतून होतेय गौ...

 सुकीनदीच्या पात्रतून बेशुमार अवैध वाळू,खरवा,माती वाहतूक 

 रावेर तालुक्यातील चिनावल,पाल,निंभोरा दसनूर,बलवाड़ी,सिंगत  नदी पात्रतून होतेय गौण खनिज तस्करी


रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यात असलेल्या सुकी नदी तील पाल,कुंभारखेडा चिंनावल वडगाव निंभोरा दसनूर सिंगनूर सिंगत बालवाडी गावांच्या परिसरातील वाळू माफिया नदीपात्रातील गौण खनिज उत्खनन करून नदीपात्रातील वाळू,खरवा,मातीचे अवैध विनापरवाना उत्खनन करीत दररोज  शेकडो ब्रास गौण खनिजांची उत्खनन करून भरदिवसा तसेच रात्रभर ट्रॅक्टर ,आयशर, डंपरने  बिनधास्त वाहतूक करीत अवैध गौण खनिज वाळू माफिया लखपती होतायत मात्र शासनाचा लाखोंच्या पटिने महसूल बुडवित आहेत


या वाळू माफियांना महसूल प्रशासन पोलीस प्रशासनासहीत कुणाचाही धाक उरलेला नाही संबंधित प्रशासनाला कार्यवाही करण्यासाठी वेळ नसल्यामुळे च या अवैध गौण खनिज तस्कर वाळू माफियांना  महसूल,पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नसल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात तर संबंधित प्रशासना व्यक्त असल्याची संधी साधून या वाळू माफियां गौण खनिज तस्करांनी संधीचे सोने केले सुकी नदी पात्रातील पाल -खिरोदा-सावदा  मार्गे चिनावल -वडगांव येथून चिनावल मोठा वाघोदा रस्ताने तर बलवाडी सिंगत सिंगनूर दसनूर वरुन निंभोरा मोठा वाघोदा रस्त्यावरुन दिवसरात्र राजरोसपणे बिनदिक्कत शेकडो ब्रास वाळू,खरवा मातीचे अवैध विनापरवाना उत्खनन करून अनेक वाहनांनी वाहतूक केली जाते आहे

रात्रंदिवस होणाऱ्या या अवैध गौण खनिज तस्करीला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळातील नाकाबंदी दरम्यान निदर्शनास आले नसावे का?? मुख्य रस्त्यावरुन अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहने व वाळू माफियांवर संबंधित प्रशासनाला मुहूर्त मिळाला नसेल का? आचारसंहिता दरम्यान असंख्य वाहनांची कसून तपासणी केली गेली अनेकावर नियमानुसार कारवाई ही करण्यात आली मग या अवैध गौण खनिज वाहतूक तस्करी ची वाहनांची तपासणी केली गेली नसावी का?की आचारसंहितेच्या आड अवैध गौण खनिज वाळू माफिया यांना गौण खनिजांची वाहतूक करण्याची सुट अथवा मुभा देण्यात आली होती व आहे का ?

असा सवाल जनमाणसात चर्चेत आहे तरी महसूल सह पोलीस प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक तस्करीला आळा घालावा व गौण खनिज वाळू माफियांवर कठोर कारवाई करुन मुसक्या आवळाव्या व शासनाच्या बुडविलेल्या महसूल ची वसुली करावी अशी मागणी उपरोक्त परीसरातील सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे

No comments