adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जमावाच्या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जमावाच्या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू हेमकांत गायकवाड चोपडा -:- बडवाणी, (पाडा) पोस्ट बिडगांव, ता. चोपडा, जिल्हा जळ...

जमावाच्या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू


हेमकांत गायकवाड चोपडा -:-

बडवाणी, (पाडा) पोस्ट बिडगांव, ता. चोपडा, जिल्हा जळगांव येथील रहिवासी शिवा ओंकार बारेला वय ३२ वर्षे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामिण पोलीस येथे सदरील घटने विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक माहिती अशी की शिवा ओंकार बारेला,हे आपल्या कुटुंबातील पत्नी शकीनाबाई तसेच मुले अर्जुन, विशाल, करण व मुलगी भारती तसेच  वडील ओंकार मालसिंग बारेला, आई सौ. बडायतीबाई, असे एकत्र राहत असुन त्यांचा मोठा भाऊ सुरेश ओंकार बारेला वय ३६ वर्षे, हा सुमारे २/३ वर्षापासुन त्याची पत्नी आशाबाई व त्याची दोन मुले सचिन, रोहन अशासह शेजारीच बडवाणी, (पाडा) पोस्ट बिडगांव, येथे राहण्यास आहे. त्यापुर्वी ते सुमारे १० ते १५ वर्ष कामानिमित्त वैजापुर, ता. चोपडा येथे राहत होते. सुमारे २/३ वर्षापुर्वी फिर्यादीचा भाऊ सुरेश हा वैजापुर येथे राहत असतांना तो महेंद्रा पिकअप गाडी चालवित होता. त्यावेळेस त्याचे गाडीमध्ये वैजापुर येथील १० मुलांना तो काहीतरी कामासाठी मध्यप्रदेश राज्यात घेवुन जात होता. तेव्हा त्याची पिकअप गाडी पलटी होवून अपघात झाला होता त्यामध्ये सदर गाडीमधील ०४ मुलांचा मृत्यु झाला होता. तेव्हा त्याचेवर वरला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून त्या केस मध्ये त्याची सेंधवा कोर्टात केस चालु आहे. फिर्यादीचा भाऊ सुरेश हा वैजापुर येथे राहत असतांना याप्रकरणातील फिर्यादी हे त्याचेकडे वैजापुर येथे जात होते. व त्याचे घरी महिने दोन महिने त्यागावामध्ये थांबत होतो. त्यामुळे तेथील लोकांनी ते ओळखतात. तरी आज दिनांक ०६/१२/२०२४ रोजी सेंधवा येथे  सुरेश याची कोर्टात तारीख असल्याने सकाळी ०९:०० वा. फिर्यादी व त्यांचा मोठा भाऊ सुरेश असे हे दोन्ही सुरेश याचे होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक MH 19 EL 6430 ही फिर्यादी चालवित होते व त्याचा भाऊ मागे बसुन असे सेंधवा येथे वैजापुर मार्गाने जात होते. त्यानंतर ११:३० ते १२:०० वा.चे सुमारास ते वैजापुर येथे आले असता फिर्यादी  मोटार सायकल थांबवून पाणी पित होतो. व त्याचा भाऊ सुरेश हा समोर वैजापुर गावात मेन चौकाचे बाजुला वैजापुर ते गेरूघाटी जाणारे डांबरी रोडवर गोटु रामचंद्र भिल याचे घरासमोर थांबलेला होता. त्याठिकाणी हजर असलेला वैजापुर येथील १) सुरेश अंगल्या बारेला हा फिर्यादीचे भावास म्हणाला की, मागील २ ते ३ वर्षापूर्वी एमपी मध्ये तुझ्या गाडीने आमचे लोक घेवुन जात असतांना मयत झाले आहेत. तरीपण तु एवढा बिंदास आणि मजेत गावात फिरत आहेस असे म्हणुन त्याने माझ्या भावास आज तुला जिवंत ठेवतच नाही असे बोलून त्याचेशी वाद घालु लागला, त्यानंतर थोड्याच वेळात त्याठिकाणी वैजापुर येथील २) अशोक पहाडु कोळी, ३) केरया रिशा वारेला. ४) प्रविण गंभीर बोरेला, ५) बबीताबाई शांतीलाल बारेला. ६) रेशमा प्रविण बारेला, ७) पालीबाई वेरसिंग बारेला, ८) कुसम केरया बारेला, ९) धरमसिंग सिध्दार्थ वारेला १०) विजय वेरसिंग बारेला ११) शर्मिला धरमसिंग बारेला हे देखील तेथे आले व वरील सर्वांनी मिळून फिर्यादी चे भावासोबत मागील घडलेल्या अपघाताचे कारणा वरून वाद करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तेवढ्यात केरया रिशा बारेला याने त्याचे हातात असलेले लाकडी दांडके फिर्यादीचे भावाच्या  डोक्यावर जोरात मारून त्याला खाली पाडले व लाकडी दांडक्याने  दोन्ही बरगड्यावर मारहाण करीत होतो, त्यानंतर तेथे हजर असलेले सुरेश झगल्या बारेला, विजय वेरसिंग बारेला, धरमसिंग सिध्दार्थ बारेला, प्रविण गंभीर बारेला अशांनी भाऊ यास उचलुन उचलुन डांबरी रोडवर पटकुन पटकुन मारहाण केली तसेच तेथे हजर असलेल्या चबीताबाई शांतीलाल बारेला, रेशमा प्रविण बारेला, पालीबाई वेरसिंग बारेला, कुसम केरया बारेला, शर्मिला धरमसिंग वारेला अशांनी शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी पोटात, छातीवर व चेहर्यावर मारहाण केलेली असुन फिर्यादी त्यांना माझ्या भावाला मारहाण करू नका असे सांगणेसाठी गेलो असता त्यातील सुरेश बारेला व केरया बारेला यांनी  तु मध्ये पडु नको तुझे पण असे हाल करून मारू असे म्हणाल्याने फिर्यादी त्यांना घाबरून तेथेच लपुन पाहत होता. त्यानंतर कोणीतरी पोलीसांना माहीती दिल्याने काही वेळात तेथे पोलीस आले. त्यांनी व वैजापुर येथील काही लोकांनी मिळून त्याला चोपडा सरकारी हॉस्पिटल येथील वाहनाने उपचारासाठी पाठवुन दिले. परंतु त्याची तब्येत जास्त सिरीयस असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारसाठी जळगाव येथे घेवुन जात असतांना तो रस्त्यातच मरण पावला असुन त्यास त्यांनी जळगाव न नेता पुन्हा चोपडा सरकारी हॉस्पिटल येथे आणले असुन त्याचा मृतदेह  पीएम रूम मध्ये असुन फिर्यादीने त्यास पाहीले असता त्याचे डोक्यावर व दोन्ही बरगड्यां, दोन्ही खांदे व कमरेला मारहाण केल्यामुळे गंभीर दुखापत करून फ्रैक्चर झाले आहे. वरील सर्व लोकांनी मागील अपघाताचे कारणावरून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केलेली असुन झालेल्या मारहाणीमुळे दुखापत होवुन त्याचेवर उपचार सुरू असतांना मयत झालेला आहे. म्हणुन शिवा ओंकार बारेला यांनी वरील सर्व लोकांविरूध्द कायदेशीररीत्या फिर्याद दाखल केली असून सदरील घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे 

No comments