सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव तर्फे सहलीचे आयोजन मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) दिनांक २५/१२/२०२...
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव तर्फे सहलीचे आयोजन
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
दिनांक २५/१२/२०२४ रोजी श्री सद्गुरू एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव यांच्यातर्फे शैक्षणिक सहली चे आयोजन करण्यात आलेले होते . तरी सहल ही सकाळी ५.३० वाजता महाविद्यालयातून निघून भद्रा मारुती वेरूळ लेणी घृष्णेश्वर मंदिर व म्हैसमाळ या चार ठिकाणी आयोजित केलेली होती . यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे , डॉ. जयश्री पाटील ' सहा . प्राध्या . सुवर्णा अहिरे , सहा प्राध्या निधी शर्मा आणि श्री अरविंद पवार , श्री चंद्रकांत सपकाळे आणि श्री पंकज वाघ उपस्थित होते .प्रत्येक ठिकाणी जसे भद्रामारूती , वेरूळ ची लेणी व त्यातील शिल्पकला याबद्दल व्यवस्थित माहिती मिळवली गेली. तसेच १२ ज्योर्तिलिंग पैकी एक घृष्णेश्वर मंदिराला भेट दिली तसेच म्हैसमाळ येथे प्रतिबालाजी मंदिर व परिसराने सहलीचे आकर्षण वाढवले .ही सहल आयोजित करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके यांनी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तसेच महाविद्यालयाच्या प्र . प्रा . डॉ.अनिता वानखेडे महाविद्यालयातील डॉ. प्रतिभा पाटील , डॉ. जयश्री पाटील , सहा .प्राध्यापक निधी शर्मा , सुवर्णा अहिरे , पंकज वाघ , अरविंद पवार यांचे सहकार्य लाभले .

No comments