देवगड ,चोपडा येथे पथनाट्यतून सुरक्षित बाळंतपणा चा लोकजागर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज दिनांक १८/१२/२०२४ रोजी देवग...
देवगड ,चोपडा येथे पथनाट्यतून सुरक्षित बाळंतपणा चा लोकजागर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दिनांक १८/१२/२०२४ रोजी देवगड या गावात अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व Jpiego यांच्या सुरू असलेल्या AMPLI-PPHI प्रोजेक्ट*च्या community awareness activitiy समुदाय जनजागृती कार्यक्रमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून देवझिरी उपकेंद्राला 24/7 सेवा देणाऱ्या कर्तव्यदक्ष आरोग्य सेविका निला कोळी मॅडम यांची लक्षणीय उपस्थिती होती सोबतच गावातील पटेल, आशा, अंगणवाडी सेविका,सामाजिक कार्यकर्ते, महिला उपस्थित होते. सोबत जपायगो चे आम्रपाली मुरार मॅडम, उज्वल भगत सर, व्हिटॅमिन अंजेल चे छाया गुरव ,नागपूर व टीम, प्रकल्प संयोजक दीपक संदाननशिव उपस्थित होते.
दिपक संदानशिव यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडली तद्नंतर टीम ने पथनाट्य सादर केले व गावकऱ्यांना आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मिळणाऱ्या सेवा तसेच योजना याबाबत लोकांना माहिती दिली व सुरक्षित बाळंतपणासाठी प्रसूतीपूर्व तसेच बाळंतपणा दरम्यान महिलेची ( ANC मातेची) घ्यावयाची काळजी व त्याबाबतचे उपयोजन याबद्दल गावकर्यांना सविस्तर माहिती कार्यक्रमातून दिली.
यासाठी आपल्या चोपडा तालुक्याचे आरोग्य दूत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर सर व आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील तसेच Jpiego च्या PO - आम्रपाली मुरार , दीपक संदनशिव , भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती कार्यक्रम गाव पातळीवर,शाळांवर तसेच पाड्यांवर, वस्त्यांवर राबविले जात आहेत .
शेवटी कार्यक्रमाचा समारोप सागर पावरा सर व प्रिती बारेला यांनी आपल्या स्थानिक भाषेत शब्दसुमानाने सर्व गावकर्याचे आभार मानले यावेळी लेनिन महाजन, ज्ञानेश्र्वर सोनवणे, शिवा बरेला, निशांत कोळी इ उपस्थीत होते
कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य निशांत कोळी यांनी केले.

No comments