झेंडीगेट, अहिल्यानगर येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कारवाईमध्ये ४ आरोपींसह ९,२८,०००/- रूपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात ...
झेंडीगेट, अहिल्यानगर येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कारवाईमध्ये ४ आरोपींसह ९,२८,०००/- रूपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात
------------------------------------------------------
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या अवैध गोमांस विक्री व्यावसायिकांविरूध्द कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. दिनांक ०८/१२/२०२४ रोजी पहाटे ०३:०० वा.सुमारास अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती काढत असताना तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर परिसरामध्ये सरकारी शौचालयाजवळील पत्राच्या शेडमध्ये काही इसमांनी गोवंशी जातीचे जिवंत जनावराची डांबुन ठेवून त्यांची कत्तल करत आहे. तपासी पथकाला मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जात जाऊन खात्री केली असता गोवंशीय जनावरांची कत्तल करताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना ३ इसम फरार झाले. ताब्यातील इसमांना त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे १) अल्तमश अब्दुल कुरेशी, वय २५, रा.व्यापारी मोहल्ला, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर २) इरफान सय्यद मोहम्मद हनीफ, वय ३०, रा.कोठला, झेंडीगेट, अहिल्यानगर ३) अरकान असीफ कुरेशी, वय २३, रा.व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर ४) अश्रफ शौकत खान, वय २६, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीतांना फरार इसमांनची नावे विचारले असता त्यांनी ५) फैजान इद्रीस कुरेशी फरार ६) सुफियान उर्फ कल्लु इद्रीस कुरेशी फरार व ७) शोएब अब्दुल रऊफ कुरेशी फरार असे सांगीतले.
पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यामधुन ३,२६,०००/- रू किं. १६३० किलो वजनाचे गोमांस, १,००,०००/- रू किं. ५ गायी, २,०००/- रू किं. एक वासरू, लोखंडी सत्तुर व ५,००,०००/- रू किं एमएच-१६-सीसी-९४१० अशोक लेलंड कंपनीचे वाहन असा एकुण ९,२८,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये वर नमूद ७ आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 1290/2024 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ)(ब) (क) 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीतांना गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments