कुस्ती स्पर्धेत खडसे महाविद्यालयाचे यश मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर:- श्रीमती जी.जी.खडसे महाव...
कुस्ती स्पर्धेत खडसे महाविद्यालयाचे यश
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर:-श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर महिला कुस्ती संघाने नुकत्याच आप्पासाहेब र.भा.गरुड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदूर्णी येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत विजेते पद प्राप्त केले व पुरुष गटात कुस्ती (ग्रिको प्रकारात) तृतीय क्रमांक मिळवीला.
या स्पर्धेत कु.भाग्यश्री सोनी,कु. योगिता पाटील, कु.वैष्णवी पाटील व काजल पाटील व प्रणय बावस्कर यांनी चमकदार कामगिरी करत जळगाव विभाग कुस्ती संघात आपले स्थान निश्चित केले.
खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके आणि हनुमान व्यायामशाळा, वरणगाव चे वस्ताद नामदेव मोरे यांनी व दिलीप संघीले (क्रीडा शिक्षक), संजय बावस्कर (तांत्रीक पंच कुस्ती) यांनी दिलेल्या ट्रेनिंग चा या खेळाडूंना विशेष लाभ झाला.
खेळाडूंच्या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड. सौ.रोहिणीताई खडसे - खेवलकर, उपाध्यक्ष नारायण चौधरी,सचिव डॉ. सी.एस. चौधरी प्रो.डॉ. एच.ए.महाजन , सर्व प्राध्यापकवृंद ,तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
No comments