न्हावी परिसरात हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले थंडीमुळे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता इदू पिंजारी फैजपूर न्हावी सह परिसरात थंडीने जोर धरला आ...
न्हावी परिसरात हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले थंडीमुळे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता
इदू पिंजारी फैजपूर
न्हावी सह परिसरात थंडीने जोर धरला आहे. थंडी खूपच मोठ्या प्रमाणात असून दिवसाही स्वेटर घालण्याची वेळ जनतेवर आली आहे. न्हाऊ परिसरात रब्बी हंगामात हरभरा या पिकाची पेरणी जास्त प्रमाणात झाली आहे. पर्यायाने हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यावर्षी हरभरा पिकाच्या पेरणीनंतर थंडीने जोर धरला. आणि हे वातावरण हरभरा पिकासाठी फारच उपयुक्त असते. त्यातही जमिनीत ओलावा आहे. अशा पोषक परिस्थितीमध्ये हरभऱ्याचे पीक जोमाने वाढत आहे. हीच परिस्थिती काही दिवस कायम राहिल्यास हरभरा पिकाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होईल असे अनुभवी शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

No comments