adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हिंगोण्यातील १०वी चे विद्यार्थी २७ वर्ष नंतर एकत्र...

  हिंगोण्यातील १०वी चे विद्यार्थी २७ वर्ष नंतर एकत्र... यावल प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज दिनांक २९ /१२/ २०२४, वार रविवार, रोजी ...

 हिंगोण्यातील १०वी चे विद्यार्थी २७ वर्ष नंतर एकत्र...


यावल प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

आज दिनांक २९ /१२/ २०२४, वार रविवार, रोजी प्रभात विद्यालय हिंगोणे, या ठिकाणी इयत्ता दहावी वर्ष १९९७ -१९९८ बॅचचा "विद्यार्थी मेळावा "संपन्न झाला.

       सदर मेळाव्यास प्रभात विद्यालय हिंगोणे, चे विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय श्री. एम. जे. गाजरे सर यांनी अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थिती दिली व मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. तसेच आदरणीय उपशिक्षक श्री.सुरवाडे सर,श्री. सपकाळ सर, श्रीमती.मंगला बोदडे मॅडम, श्री.लोखंडे सर, श्री. सिद्धेश्वर वाघुळदे सर, व माजी शिक्षक फिरके सर व झांबरे सर उपस्थित होते.

         श्रीमती. प्रणाली झोपे व श्रीमती.पल्लवी पाटील यांनी विद्यार्थी दशेत असताना येणाऱ्या भावना मनोगत पर व्यक्त केल्या.

       सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिपक गुळवे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री भरत पाटील यांनी केले.

 कार्यक्रमास एकूण ३८ विद्यार्थी हजर होते, सर्व विद्यार्थ्यांनी आपापसात विद्यार्थी असतानाच्या भावना व्यक्त केल्यावर एकमेकांना एकूण २७ वर्षानंतर भेटीचा सुवर्ण आनंद व्यक्त केला.

       " विद्यार्थी मेळावा " कार्यक्रमाचा समारोप, झाल्यानंतर भरीतपुरी, वरण-भात, कढी, दही -कोशिंबीर जिलेबी असा भोजनाचा छान बेत होता. सर्व विद्यार्थीनी शेवटी भावना विवश होत त्यांनी एकमेकांना निरोप दिला.

No comments