Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गंभीर गुन्ह्यात सात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदीत दरम्यान आवळल्या मुसक्या

  गंभीर गुन्ह्यात सात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदीत दरम्यान आवळल्या मुसक्या अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी)...

 गंभीर गुन्ह्यात सात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदीत दरम्यान आवळल्या मुसक्या


अहिल्यानगर (दि.३० प्रतिनिधी):-

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

गंभीर गुन्हयात तब्बल ७ महीन्या पासुन फरार असलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान जेरबंद केले आहे. करण नंतर काळे (वय २८ वर्ष रा.उघड मळा,वडगाव गुप्ता ,ता.जि अहिल्यानगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.दि.३० डिसेंबर  रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी सपोनी. माणिक चौधरी यांच्या आदेशाने सहयाद्री चौक, एम.आय.डी.सी येथे नाकाबंदी चालु असताना  सपोनी.श्री.चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की फरार असलेला आरोपी  हा नगर मनमाड हायवे रोडने त्याचे राहते घरी जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सहयाद्री चौक, एमआयडीसी येथे पोसई/विनोद परदेशी, पोहेकॉ/म्हस्के,पोना/बोरुडे,पोकॉ/नवनाथ दहीफळे,पोहेकॉ/फकीर शेख,पोकॉं/नागरे अशांना सदर बातमी कळविली व सदर ठिकाणी नाकाबंदी चालु असताना एक इसम हा पल्सर मोटर सायकलवर तोंडाला रुमाल बांधून संशयीत रित्या गाडी घेवुन जाताना दिसला सदर इसमाचा संशय आल्याने त्यास पोलिस कर्मचाऱ्यांनी हात कारुन गाडी बाजुला करुन घेण्यास सांगीतले असता त्याने त्याची मोटार सायकल ही भरधाव वेगाने पळवुन घेवुन जात असताना त्याचा मोठया शिताफीने पाठलाग करुन त्यास पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव करण नंतर काळे (रा.उघडमळा,वडगाव गुप्ता,ता.जि अहिल्यनगर असे असल्याचे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आले.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई/विनोद परदेशी,पोसई/ आढाव,पोहेकॉ/म्हस्के, पोहेकॉ/नेहुल,पोहेकॉ/ फकीर शेख,पोहेकॉ/गणेश पालवे,पोना/महेश बोरुडे,पोकॉ/नवनाथ दहीफळे,पोकॉ/सचिन नागरे यांनी केली आहे.

No comments