"कौशल्य आधारित शिक्षणातच रोजगाराच्या संधी...." मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) कवयत्री बहिणाबाई चौ...
"कौशल्य आधारित शिक्षणातच रोजगाराच्या संधी...."
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय मिशन सहासी अभियानाचा आज १८/१२/२४ दुसरा दिवस आजच्या पहिल्या सत्रात श्रीमती. जी. जी. खडसे महाविद्यालयातील डॉ. प्रा. प्रतिभा ढाके यांनी विद्यार्थिनींना झुंबा चे प्रशिक्षण दिले. यात विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.
दुसऱ्या सत्रात मिशन सहासी अभियाना अंतर्गत आपल्याला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक सौ. रंजना महाजन यांनी "महिलांना रोजगाराच्या संधी" या विषयावर मार्गदर्शन करताना वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली जसे पंतप्रधान रोजगार योजना, कृषी क्षेत्रात असणारे स्वयंरोजगार, बचत गट, महिला उद्योग निधी योजना इ. असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. अभियान यशस्वी करण्यासाठी.
प्रा. डॉ. संजीव साळवे विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. डॉ. अतुल बढे सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा. सविता जावळे महिला विद्यार्थी विकास अधिकारी तसेच युवतीसभेचे सदस्या प्रा. डॉ. ताहिरा मीर, प्रा. डॉ. सुरेखा चाटे, प्रा. सीमा राणे यांनी परिश्रम घेतले.

No comments