adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

  धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन इदू पिंजारी फैजपूर फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात म...

 धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन


इदू पिंजारी फैजपूर

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात मॉडर्न प्रोस्पेक्टिव्ह इन फिजिकल अँड केमिकल सायन्सेस - २०२४ (एमपीपीसीएस- २०२४) या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक २८ डिसेंबर २०२४ शनिवारी करण्यात आले आहे.


 प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान (पी एम उषा),  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय राष्ट्रीय परिषद दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचा उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर तथा माजी आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ यांच्यासहित अधिवेशनाचे उद्घाटक प्रोफेसर सुनील भिरूड, माननीय कुलगुरू सी ओ ई पी टेक्निकल युनिव्हर्सिटी पुणे यांच्यासहित प्र कुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे, प्रोफेसर आशुतोष बेडेकर एम एस युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा वडोदरा, प्रोफेसर डॉ एस एस राजपूत अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा,  प्रोफेसर बाबासाहेब डोळे विभागप्रमुख पदार्थविज्ञानशास्त्र डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, प्रोफेसर दीपक दलाल डायरेक्टर, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, प्रा डॉ विपुल खेराज सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत, प्रा डॉ सचिन येवले विभाग प्रमुख रसायनशास्त्र विभाग पी ओ नाहाटा महाविद्यालय, भुसावळ,  प्रोफेसर जे व्ही साळी चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज पदार्थविज्ञानशास्त्र व डायरेक्टर स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, प्रोफेसर जी एच सोनवणे, चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज रसायनशास्त्र विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यासहित तापी परिसर विद्या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांची उपस्थिती लाभणार आहे.

 राष्ट्रीय अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे तसेच प्रा डॉ हरीश तळेले ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, प्रा एस आर कोल्हे पीएम उषा समन्वयक, प्रा डॉ पद्माकर पाटील जॉईंट ऑर्गनायझिंग सेक्रेटरी,  प्रा डॉ ए के पाटील खजिनदार, प्रा डी बी तायडे विभागप्रमुख रसायनशास्त्र विभाग यांच्यासहित सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विविध समिती समन्वयक व सदस्य परिश्रम घेत आहेत.

No comments