Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहरातील गांधी मैदानात तलवार घेऊन थांबलेला सराईत आरोपी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद

  शहरातील गांधी मैदानात  तलवार घेऊन थांबलेला सराईत आरोपी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद अहिल्यानगर (दि.२७ प्रतिनिधी):- (संपादक -:-हेमकांत गायकवा...

 शहरातील गांधी मैदानात  तलवार घेऊन थांबलेला सराईत आरोपी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद


अहिल्यानगर (दि.२७ प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान परिसर येथे तलवार घेऊन थांबलेल्या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.जॉन कासिनो परेरा (वय ३६,रा.चंदे बेकरी जवळ,बंगाल चौकी, अहिल्यानगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.२६ जानेवारी

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रात्री ११.३० वाजता उपविभागीय पोलीस अधीकारी अमोल भारती यांना माहिती मिळाली की, गांधी मैदान येथे सराईत गुन्हेगार जॉन परेरा हा तलवार घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत उभा आहे.त्यावरुन कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने मध्यरात्री आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या कडील तलवारही हस्तगत करण्यात आली. त्याच्या विरोधात दहशत करणे व अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक/प्रताप दराडे,सपोनी योगिता कोकाटे,पोहेकॉ/संदीप पितळे,पोहेकॉ/विशाल दळवी,तानाजी पवार, सुरज कदम,अतुल काजळे,सचिन लोळगे, संकेत धिवर यांनी केली आहे.

No comments