शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी नेशन महारा...
शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी
नेशन महाराष्ट्र ब्युरो जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
धुळे :- शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे श्री आबासाहेब सतिलाल भटा पाटील निवासी व आदिवासी मुलींची प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खान्देश सुपुत्र तसेच ( कॅनडा )देशातील ओंटोरीया राज्याच्या ओंटोरीया सेवा पुरस्कार प्राप्त तसेच कॅनेडियन सर्विसेस संस्थेचे अध्यक्ष तसेच कॅनेडियन केअर अँड शहर असोसिएशन ओटावा तसेच हिंदू समुदाय ओटावा (कॅनडा ) चे उपाध्यक्ष आदरणीय दादासो श्री गणेशजी सतिलाल पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमासाठी श्री गणेश फाउंडेशन चे अध्यक्ष श्री आबासो सतिलाल भटा पाटील यांनी मार्गदर्शक म्हणून स्थान स्विकारले तसेच आश्रम शाळेचे सचिव श्री दादासो प्रवीण सतीलाल पाटील हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. एस. पावरा सर व श्री एच .डी. चौरे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर पाटील सरांनी केले प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण केले तसेच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा श्री दिनेश वसईकर सर तसेच अमोल पाटील सर उदय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन व शहीद जवानांना श्रद्धांजली तसेच विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य व देशभक्तीपर गीत सादर केले आश्रम शाळेतील मुख्याध्यापक आर.वाय. सोनवणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
No comments