Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथील युवा चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांचे पुन्हा एकदा नव्याने शिवांश या चित्राची निवड

चोपडा येथील युवा चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांचे पुन्हा एकदा नव्याने शिवांश या चित्राची निवड महाराष्ट्रातुन ४० नामवंत चित्रकारचे हिवाळी...

चोपडा येथील युवा चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांचे पुन्हा एकदा नव्याने शिवांश या चित्राची निवड

महाराष्ट्रातुन ४० नामवंत चित्रकारचे हिवाळी चित्र प्रदर्शन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

चोपडा येथील युवा चित्रकार अनिलराज पूनमचंद पाटील यांची पुन्हा एकदा नव्याने सातारा येथील औंध संस्थान च्या औंध हेरिटेज या आर्ट गॅलरीत जानेवारी २०२४  नवीन युवा निवडक महाराष्ट्रातुन ४० नामवंत चित्रकारचे हिवाळी चित्र प्रदर्शन सुरु होत आहे. हे प्रदर्शन ३ महिने सुरु असणार आहे.... यात अनिलराज यांचे शिवांश या चित्राची निवड झाली आहे... दरवर्षी हे हिवाळी चित्र प्रदर्शन भरवले जाते. औंध हेरिटेज आर्ट गॅलरी चे अध्यक्ष अक्षय बापट यांनी अनिलराज पाटील यांना निवड झालेल्या चे पोस्टर पाठवले,शिवांश हे चित्रकृती ही पेन इंक च्या साहाय्याने तयार केली आहे यात महादेव चे शिवलिंग असून त्यात गणेशा तयार केला आहे.           


                       अनिलराज हे चोपडा च्या ललित कला केंद्र चे माजी विद्यार्थी असून अनेक चित्र पुरस्कार ने सन्मानित केले आहे...     माजी प्राचार्य राजेंद्र महाजन, प्राचार्य सुनिल बारी सर, प्रा. नेवे सर, प्रा. पाटील सर, लिपिक श्री.भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी, यांनी कौतुक केले. व मित्रपरिवार तर्फे ही शुभेच्छा देण्यात आले.

No comments