सावदा पोलीसांनी पकडला दीड लाखांचा गुटखा ३ मोटारसाकलीही जप्त रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) सर्वोच्च न्यायालयाने ...
सावदा पोलीसांनी पकडला दीड लाखांचा गुटखा ३ मोटारसाकलीही जप्त
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित सुगंधीत पानमसाला तंबाखू व विमल गुटखा चिनावल ते उटखेडा दुचाकीवरून नेत असल्याने सुकी नदीच्या पुलावर सावदा पोलिसांनी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात पोलिसांनी १ लाख ६१ हजार १०५ रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. उटखेडा चिनावल रस्त्यावर सुकी नदी पुलाजवळ दुचाकीवर रोझोदा येथील अजय शांताराम कोळी (वय ३७) व चिनावल येथील यश उर्फ योगेश पीतांबर चौधरी (वय २७) व लोहारा येथील अस्लम सलीम तडवी (वय २९) हे गुटखा वाहतूक करत असताना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर दुचाकी (एमएच १९, बीए ७५७८) सह १ लाख ६१ हजार १०५ किमतीचा गुटखा जप्त केला. पुढील तपास सावदा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे पो हे कॉ.निलेश बाविस्कर करीत आहेत.

No comments