adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा यावल विधानसभा मतदार संघातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

  चोपडा यावल विधानसभा मतदार संघातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न  चोपडा प्रतिनिधी रविंद्र कोळ...

 चोपडा यावल विधानसभा मतदार संघातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न 


चोपडा प्रतिनिधी रविंद्र कोळी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

  विविध विषयांनवर आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या विभाग निहाय आढावा घेऊन पुढील बैठकीत येतांना पुर्ण अभ्यास करून यावा अशी ताकिद दिली.चोपडा मतदार संघातील नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही सांगितले व खालील प्रमाणे विभागीय आढवा घेतला.

सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्य अधिकारांकडे रिक्त जागांचा संबंधित पाठपुरावा करावा

सर्व पोलीस ठाण्यात वाहने बाबत व रिक्त जागांन बाबत वरिष्ठांना प्रस्ताव पाठवा

चोपडा तालुक्यातील जनतेत शांतता राहवी व चोऱ्या होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

उपजिल्हा रुग्णालय

 सिझरसाठी पेशंट जळगावला पाठवू नये

एच एम पी व्ही साठी काय उपाय योजना केल्यात 

कर्मचारी निवासस्थानी बांधकाम सुरु करावेत

प्राथमिक आरोग्य केंद्र

प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी पुरवठा विभागात साथ  रोगाचा पार्शभूमिवर औषधीचा तुटवळा भासणार नाही तसेच एक्सपायरी दिनांक तपासा

यावल प्रकल्प अधिकारी

शासकिय आश्रम शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावे

चोपडा शहरातील मुंलीचे वस्तीगृह बांधकाम मोजणी करून तात्काळ सुरु करावे

आदिवासी गांवानमध्ये सर्व पद अधिकारी संमेत पेसा गावास्तरावर बैठका घ्याव्यात

आदिवासी बांधवांना चांगल्या आरोग्य सुविधा साठी जिल्हा वाणिज्य योजनेतून ॲम्बुलंस खरेदी कराव्यात 

रस्त्यांचे कामे दर्जेदार करावेत

चोपडा शहरात पाणी पुरवठा हात्यातील आठ कालवधी २ दिवसांनी कमी करावा

सार्वजनिक बांधकाम विभाग

दोषदायित्व कालावधीत ज्यांचा कडे  शिल्लक असलेल्या रस्त्यांची दुरुस्थी करावी,२०० खाटांचे रुग्णालयचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करण्यात यावे,अंकलेश्वर ब्रहानपूर रस्त्यावरील पुलांची तात्काळ दुरुस्ती करावी,आवश्यक गावांना सामूहिक पाणीपुरवठा योजना घ्याव्यात,वनविभागने डिंकासाठी झाडांना जे इंजेक्शन दिले जातात त्यावर निर्बंध घालावेत तसेच वृक्षतोड होणार नाही याची दक्षता घ्यावी,राज्य उत्पादन शुल्क इमारत बांधकाम तात्काळ मार्गी लावेत,मध्य प्रदेशातील अवैध दारू येणार नाही याची दक्षता घ्यावी.या आढावा बैठकीत भाऊसाहेब थोरात तहसिलदार,मोहन माला नाझरकर तहसिलदार यावल,आण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलिस अधिकारी भाग चोपडा,राहुल पाटील मुख्य अधिकारी चोपडा न.पा,उपजिल्हा रुग्णालय येथील डॉ सुरेश पाटील,महेंद्र पाटील आगार प्रमुख,दिपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी,कविता सुर्वे शिक्षण अधिकारी,उप अभियंता विरेंद्र  राजपुत,जे एस तडवी सार्वजनिक बांधकाम विभाग चोपडा व यावल,प्रदिप लासुरकर तालुका आरोग्य अधिकारी,किशोर सपकाळे गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल व इतर अधिकारी उपस्थित होते.

No comments