जळगांव पोलीस दल एकता चषक क्रिकेट स्पर्धेत सावदा पोलीस स्टेशन संघ विजयी मुक्ताईनगर उपविभाग स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक संघात सर्वधर्मी...
जळगांव पोलीस दल एकता चषक क्रिकेट स्पर्धेत सावदा पोलीस स्टेशन संघ विजयी
मुक्ताईनगर उपविभाग स्पर्धेत पटकाविला प्रथम क्रमांक संघात सर्वधर्मीय खेळाडूंचा समावेश
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या युक्तीने मुक्ताईनगर चे पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर भाग कार्यालय अंतर्गत एकता चषक क्रिकेट स्पर्धा २०२५,
२६/०१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुक्ताईनगर येथे सर्वधर्मीय खेळाडू समावेशक एकता चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मुक्ताईनगर, सावदा, वरणगाव व बोदवड येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील सर्व धर्मीय क्रिकेट खेळाडू यांच्या मिळून संघ (टीम )तयार करण्यात आले होते. या स्पर्धेमधील सामन्यात सावदा पोलीस स्टेशनच्या टीमने उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करीत उपविभाग स्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले सावदा पोलीस स्टेशनच्या क्रिकेट सामना संघात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोहेकॉ यशवंत टहाकळे पोहेकॉ.निलेश बाविस्कर पो कॉ मयूर पाटील यांचेसह सर्व धर्मीय खेळाडूंचा समावेश होता सावदा पोलीस स्टेशन क्रिकेट टीम ने विजेतेपदक मिळविल्याने सर्वत्र अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे



No comments