माहिती अधिकार व जनहितास्तव असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या लोकसेवकांवर कार्यवाही करा जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेल व्दारे मागणी :--...
माहिती अधिकार व जनहितास्तव असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या लोकसेवकांवर कार्यवाही करा जिल्हाधिकाऱ्यांकडे ईमेल व्दारे मागणी :--- भगवान चौधरी माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व निर्माण करण्याच्या दृष्टीने , सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून नागरिकांच्या माहिती मिळण्याच्या व्यवहार्य पध्दत आखुन देण्याकरिता केन्द्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ पारित करण्यात आला. शासनाने ५ मे.२०१५ च्या शासन निर्णयात मा. जिल्हाधिकारी सो. यांची माहिती अधिकार कायद्याचे नोडल अधिकारी घोषित करुन प्रत्येक लोकशाही दिनी जिल्हा प्रमुखांच्या सभेत आढावा घेण्याचे सुचीत केले आहे तरी सुद्धा बहुतेक प्राधिकरणात लोक सेवक हे सदर कायद्याच्या अंमलबजावणी बाबत हेतुपूर्वक टाळाटाळ करतात,अशा केन्द्रीय राजपत्रातिल कायद्याची व शासनाच्या वैध आदेशांचे ऊल्लघन करणाऱ्या लोकसेवकांवर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी भगवान चौधरी यांनी मा. जिल्हाधिकारी सो. यांच्या कडे ईमेल व्दारे केली आहे.
No comments