प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कला गुणांचा प्रकल्प.… चोपडा (प्रतिनिधी)--- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) येथील प्रताप विद्या मंदिराच्या...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कला गुणांचा प्रकल्प.…
चोपडा (प्रतिनिधी)---
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
येथील प्रताप विद्या मंदिराच्या प्राथमिक विभागातर्फे पहिलीच्या विद्यार्थ्यांना कला गुणांना वाव मिळावा यासाठी प्रकल्प नुकताच राबविण्यात आला.डाळी बिया ,धान्य, भाज्या ,फळे ,फुले आणि रांगोळी, रंगीत कागद, केक यांचा वापर करून तिरंग्याची कलाकृती साकारली या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तिरंग्याची कलाकृतीने शिक्षकांचे मनं जिकून घेतली यावेळी
सदर विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. अभिषेक शुक्ल ,श्रीमती रश्मी देशमुख ,श्रीमती प्रतिभा सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनील पाटील यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
No comments