adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवावे...... शेतकरी संघटनेची मागणी

  चोपडा तालुक्यात सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवावे...... शेतकरी संघटनेची मागणी  चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) शासनाने ...

 चोपडा तालुक्यात सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवावे...... शेतकरी संघटनेची मागणी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

शासनाने किमान आधारभूत किंमतीच्या आधारे कापूस खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांच्या घरात कापूस आल्यापासून सुरू झाले तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल हे शासनाला माहीत असुनही शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी खंत व्यक्त केली 

दरवर्षी कापसाचे उत्पादन सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या घरात येत असते सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने मजबुरीने 80% शेतकऱ्यांनी घरातील कापूस कमी अधिक भावात विक्री केलेला आहे गेले दोन महिन्यापूर्वी शासनाने मोठा गाजावाजा करत जळगाव जिल्ह्यात सीसीआयचे 11 खरेदी केंद्र सुरू केल्याची जाहिरात केली मात्र मनुष्यबळ कमी असल्याने व शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे अकरा खरेदी केंद्रांपैकी चारच खरेदी केंद्र सुरू होती त्यातही कापूस खरेदी दोन दिवस बंद दोन दिवस सुरू असा प्रकार सातत्याने घडत राहिल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस खरेदी केंद्रावर आणून सुद्धा दोन दोन तीन दिवस वाट पाहत थांबावे लागले त्याच्यातच चोपडा तालुक्यात बागायती कापूस भरपूर प्रमाणात लागवड होत असतानाही कापूस खरेदी केंद्र मात्र जानेवारीमध्ये सुरू करण्यात आले.जेमतेम आठवड्यातून सोमवार व मंगळवार असे दोनच दिवस कापूस खरेदी सुरू असून महिन्यातून फक्त सहा दिवस कापूस खरेदी झालेली आहे.

चोपडा तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस घरात शिल्लक राहिलेला आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपत नाही तोपर्यंत सीसीआयने खरेदी केंद्र चोपड्यात चालू ठेवावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी केलेली आहे.

No comments