निमगव्हाण येथील ज्ञानज्योत क्लास कडून स्नेहसंमेलन कार्यक्रम सोहळा संपन्न. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा. तालुक्यातील न...
निमगव्हाण येथील ज्ञानज्योत क्लास कडून स्नेहसंमेलन कार्यक्रम सोहळा संपन्न.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा.तालुक्यातील निमगव्हाण येथील ज्ञानज्योत क्लास मार्फत सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा अति उत्साहात संपन्न झाला.तसेच विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमांमधून सुप्त गुणांना वाव मिळावा आणि पाल्यांमध्ये त्यांना एक उत्कृष्ट वक्ता,कलाकार,गायक,डान्सर असे गुण पहावयास मिळाले
व विद्यार्थ्यांनी देखील श्रोत्यांचे मन जिंकले.आणि पालक देखील त्यांचे कार्यक्रम बघून खूप भारावून गेले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मागासवर्गीय उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट चे ज्ञानेश्वरभाऊ भालेराव हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती चे माजी सभापती यशवंतनाना पाटील होते.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून निमगव्हान गावाचे सरपंच दिनेशभाऊ सपकाळे,वाघळुद बु गावाचे सरपंच सुकदेव पाटील,माजी सरपंच सुभाषअण्णा पाटील, निमगव्हान चे उपसरपंच देवानंद भाऊ पाटील,सदस्य धनराजभाऊ बाविस्कर,सदस्य धनराजभाऊ पाटील,वाघळुद बु चे वि.सो.सा.चे चेअरमन मच्छिंद्र पाटील,आशिष भाऊ,सुशील भालेराव सर,टेमलालअण्णा पाटील,पोलीस पाटील पवन भिल,तंटामुक्त अध्यक्ष राजू भाटिया,प्रशांत पाटील,शुभम पाटील,पंकज भाटिया,अनिकेत बाविस्कर,सुनील भाटिया,गजानन सपकाळे,बाळू बाविस्कर,निवृत्ती बाविस्कर,अनिल मोतीराळे,बापू पाटील,नारायण पाटील सर,प्रदीप बाविस्कर,गौरव बाविस्कर,सौरव बाविस्कर शालिक थोरात,विकास मोरे,व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जयश्री बाविस्कर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.मोहन लहासे सर यांनी केले.आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानज्योत क्लास चे संचालक अविनाश बाविस्कर सर यांनी मेहनत घेतली.


No comments