आदिवासी कोळी महासंघ व महाएकता फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन नेशन महाराष्ट्र ब्युरो (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आ...
आदिवासी कोळी महासंघ व महाएकता फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन
नेशन महाराष्ट्र ब्युरो
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आदिवासी कोळी महासंघ व महा एकता फाउंडेशन तर्फे १६ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे व्यसनमुक्त समाज अभियानात राज्यातील ग्रामीण भागातील हे सातवे महा व्यसनमुक्ती 'अपूर्व आनंदमार्ग'निवासी शिबिराचे आयोजन प्रितीकेश दादा मंगल कार्यालय वाघाडी फाटा केले आहे यात तरुणांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना ध्यान सेवा सत्संग खेळ कीर्तन प्रवचन होतील. शिबिरात गोधाम व्यसनमुक्तीचे अध्यक्ष गुरुवर्य डॉ. गोराम बिडवे राजुर उपस्थित राहणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर दिनांक १५ तारखेपर्यंत सर्वांनी नाव नोंदणी करून घ्यावी व योजनेचा लाभ घ्यावा. तरी जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी या निवासी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी कोळी महासंघ व महा एकता फाउंडेशनच्या वतीने मनोहर कोळी ,योगेश्वर कोळी , विनोदभाऊ उर्फ शिवाभाई कोळी ,अखिल शेख , गोपाल कोळी , बंटी कोळी यांनी केले आहे आहे.

No comments