तालुकास्तरीय भूगोल चित्र प्रदर्शनात सनपुले आश्रमशाळेचे यश चोपडा (प्रतिनिधी) (संपादक-:- हेमकांत गायकवाड) येथील कला,शास्त्र, वाणिज्य महाव...
तालुकास्तरीय भूगोल चित्र प्रदर्शनात सनपुले आश्रमशाळेचे यश
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
येथील कला,शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय,चोपडा. अंतर्गत तालुकास्तरीय भूगोल विषयाच्या संदर्भातील पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा घेण्यात आली.यात कमी साधन सुविधा असताना देखील आपल्या स्वयंप्रेरणेतून आणि चित्रातून विविध गोष्टींचे यथार्थ दर्शन घडवणारे पोस्टर सनपुले आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सादर करत सहभाग नोंदवला व यश संपादन केले.पर्यावरण रक्षण,स्वच्छ परिसर सुंदर प्रदेश,नैसर्गिक साधन संपत्ती,जल-जमीन-जंगल, पर्यावरण ऱ्हासामुळे मानवी जीवनावरील परिणाम आदी विषयांच्या अंतर्भाव करण्यात आला होता.यामध्ये सहभाग नोंदवत सनपुले आश्रमशाळेचे विद्यार्थी सुरेश संतोष बारेला व राहुल किशोर बारेला (बारावी कला)यांना द्वितीय क्रमांक मिळाला.तर रोहिदास मेहेरसिंग बारेला (बारावी कला)यास तृतीय क्रमांक मिळाला.त्यांना मिलिंद पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील सचिव गणेश पाटील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

No comments