adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाई चा बडगा -पीआय विशाल जायसवाल

  वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाई चा बडगा :- पीआय विशाल जायसवाल  पोलीस स्थापना दिनानिमित्त वाहतुकीचे नियम व स्वाक्षरी मोहीम राबवितांना पोल...

 वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाई चा बडगा :-पीआय विशाल जायसवाल 

पोलीस स्थापना दिनानिमित्त वाहतुकीचे नियम व स्वाक्षरी मोहीम राबवितांना पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयसवाल मान्यवरांच्या उपस्थितीत वाहनधारकांना गुलाब पुष्पगुच्छ देतांना

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिनाचे औचित्याने  रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने रावेर येथे अंकलेश्वर बुर्हानपुर महामार्गावर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या उपस्थितीत वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी वाहनचालकांचे डॉ विशाल जयसवाल यांनी गुलाब पुष्पगुच्छ देत स्वागत केले. आजच्या दिवशी गुलाब पुष्प उद्या मात्र दंड वसूल केला जाईल वाहन धारकांनो वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाईचा बडगा उगारलाच जाईल अशी त्यांनी सुचना देऊन कारवाई ची वाहन चालकांना  जाणीव करून दिली तसेच मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करेल असा संदेश देणाऱ्या दर्शक फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविली 

जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, सहय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा यांच्या आदेशाने रावेर पोलीसांनी पोलीस स्थापना दिवसानिमित्त  राबविली स्वाक्षरी या मोहिमेत शांतता समिती सदस्य व शहारातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी वाहुतुकीच्या नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लहान मुलांना वाहन चालवण्यासाठी देवू नये, दिल्यास लहान मुलाच्या वडिलांना दंड कारण्यात येईल, नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, नियमाने चला, कोणीही कायद्याचे उल्लघन करू नये, अशा सूचना वाहन चालकांना पोलिसांतर्फे देण्यात आल्या.

No comments