अवैध बांधकाम विरोधात कुठलीही कार्यवाही न केल्याने नगर पालिकेत प्रहार वतीने 10 फेब्रुवारी रोजी गोट्या खेळा आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे जि...
अवैध बांधकाम विरोधात कुठलीही कार्यवाही न केल्याने नगर पालिकेत प्रहार वतीने 10 फेब्रुवारी रोजी गोट्या खेळा आंदोलन
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा
उपप्रमुख अजय टप
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- डॉ.विकेश जैन (शांती आरोग्यम् हॉस्पीटल) यांनी तत्कालीन मुख्याधिकार्यांनी बजावलेल्या नोटीसप्रमाणे दिलेल्या मुदतीत सदर अवैध बांधकाम जमीनदोस्त केले नसल्याने त्यांचेवर न.प. प्रशासनाकडून अद्यापपावेतो कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत योग्य कार्यवाही न झाल्यास १० फेब्रुवारी रोजी न.प. कार्यालयातच ‘गोट्या खेळा आंदोलन’ व पुढील टप्प्यात विविध आंदोलने करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज ३१ जानेवारी रोजी न.प. मुख्याधिकारी व न.प.प्रशासक तथा तहसीलदार मलकापूर यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मलकापूर शहर न.प. हद्दीत येत असलेल्या चाळीसबिघा परिसरातील गणेश नगरस्थित गत् काही वर्षापुर्वी शांती आरोग्यम् हॉस्पीटलची बिल्डींग उभारण्यात आली आहे. सदर बांधकाम करतेवेळी या हॉस्पीटलच्या बांधकाम कामाबाबत न.प. मधून कुठलीही बांधकाम परवानगी घेण्यात आली नसल्याबाबत मी २७.१२.२०२४ रोजी रितसर लेखी तक्रार न.प.मुख्याधिकारी यांचेकडे केली होती. या तक्रारीवरून न.प.चे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी संबंधित बांधकाम धारकास सदरचे बांधकाम एक महिन्याच्या आत जमीनदोस्त करण्यात यावे, अन्यथा आपणा विरूध्द फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र (नोटीस) दि.२७.१२.२०२४ रोजीच डॉ.विकेश जैन (शांती आरोग्यम् हॉस्पीटल) मलकापूर यांना दिले होते.
या पत्राला देवून आज एक महिन्याच्या वर कालावधी उलटला आहे. मात्र तरीही सदरचे बांधकाम हे जैसे थे असेच आहे. त्यामुळे एकीकडे न.प. मुख्याधिकारी हे अवैध बांधकामा बाबत संबंधितास पत्र (नोटीस) बजावतात. मात्र त्या पत्रावर कुठलीही कार्यवाही मुदत संपूणही झाली नसतांना सुध्दा न.प. प्रशासनातील अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्याचेच काम करीत आहेत. तत्कालीन मुख्याधिकार्यांनी बजावलेल्या नोटीसप्रमाणे डॉ.विकेश जैन (शांती आरोग्यम् हॉस्पीटल) यांनी त्यांना दिलेल्या मुदतीत सदर अवैध बांधकाम जमीनदोस्त केले नसल्याने आता त्यांचे विरोधात न.प. प्रशासनाकडून फौजदारी स्वरूपाची कारवाई केव्हा केली जाते. सदरप्रकरणी नियमानुसार योग्य ती कार्यवाही न झाल्यास येत्या १० फेब्रुवारी २०२५ रोजी न.प. कार्यालयात ‘गोट्या खेळा आंदोलन’ करण्यात येईल. त्यानंतर पुढील टप्प्यात विविध आंदोलने सुध्दा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येतील, असे निवेदनात अजय टप यांनी नमूद केले आहे.
No comments