प्रहार जनशक्ती पक्ष विरार येथे महाआरोग्य चिकित्सा व भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न शामसुंदर सोनवणे वि.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
प्रहार जनशक्ती पक्ष विरार येथे महाआरोग्य चिकित्सा व भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न
शामसुंदर सोनवणे वि.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरार:- प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या सेवाकार्य विचारधारा प्रेरणेने,पालघर जिल्हाध्यक्ष/ठाणे संपर्क प्रमुख श्री.हितेश दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष विरार पूर्व मध्यवर्ती कार्यालय येथे विनामूल्य महाआरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले लाईफ लाईन रुग्णालय,माँ सरस्वती रुग्णालय आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला
असून यामध्ये जनरल तपासणी,रक्तदाब, मधुमेह,इ.सी.जी. इत्यादी वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या.त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला. यामध्ये शेकडो नागरीकांनाही या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.तसेच रक्तदान हे श्रेष्ठ दान असून ती काळाची गरज या विचारधारा भावनेने सरला ब्लड बँक यांच्या सहकार्याने,प्रहार जनशक्ती पक्ष माध्यमातून कार्यकर्ते,युवा वर्ग,महिला भगिनींनी रक्तदान करून शिबिरात सहभाग नोंदविला रक्तदात्यांचे हितेशभाऊ जाधव यांनी आभार मानले या शिबिरात प्रहार पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला वर्ग, चिकित्सा अधिकारी, सरला ब्लड बँक टीम उपस्थित होते.


No comments