पायी दिंडीत जातीय सलोखा एकात्मतेचे दर्शन यावलच्या मुस्लिम बांधवांनी केले स्नेहभोजन सन्मान सत्काराचे आयोजन यावल/ रावेर प्रतिनिधी मुबारक तड...
पायी दिंडीत जातीय सलोखा एकात्मतेचे दर्शन यावलच्या मुस्लिम बांधवांनी केले स्नेहभोजन सन्मान सत्काराचे आयोजन
यावल/ रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील कोहळेश्वर श्रीराम मंदिरात वारकरी संप्रदायाची दिंडीचे आगमन झाले चोपडा तालुक्यातील श्रीक्षेत्र मामलदे ते श्रीक्षेत्र महंतग्राम मेहूण आदिशक्ती मुक्ताई संस्थान मेहूण येथे दरवर्षी पायी दिंडी जाते. सदर दिंडीचे यावल शहरात मुस्लिम बांधवांनी सन्मान सत्कार स्वागत केला. दिंडीत सहभागी सर्व भाविकांसाठी स्नेहभोजन चे आयोजन करीत जातीय एकात्मतेचे सर्वधर्मसमभाव सलोख्याने उपस्थित वारकऱ्यांना आपुलकीचे दर्शन घडले. मुस्लिम समाज बांधवांनी शहरातील कोळेश्वर श्रीराम मंदिरामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत
शहरातील श्री कोळेश्वर श्रीराम मंदिर आहे. या श्रीराम मंदिरामध्ये ठाकूर फोटो फ्रेमचे संचालक छब्बीर मुसा पटेल उर्फ ठाकूर यांनी मामलदे (ता. चोपडा) येथून श्रीक्षेत्र मुक्ताई संस्थान मेहूण येथे जात असलेल्या पायी दिंडीचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.
यावल शहरातील कोळेश्वर श्रीराम मंदिरामध्ये दिंडीतील भक्त, भाविकांचा मुक्काम ठेवण्यात आला. भगवान विठ्ठल गुजर मामलेदे यांच्या नेतृत्वात ही दिंडी यावल शहरात दाखल झाली. दिंडीतील सहभागी भाविक, भक्तांना या ठिकाणी स्नेहभोजन देण्यात आले. सुमारे १७५ जणांचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. ही दिंडी २७ फेब्रुवारी रोजी मेहुणे येथे पोहोचणार आहे.
मामलदे येथून श्रीक्षेत्र मुक्ताई मेहूण येथे निघालेल्या दिंडीचे कोहळेश्वर श्रीराम मंदिरात स्वागत करताना छब्बीर पटेल, सोबत उपस्थित वारकरी. माणुसकीचा धर्म जोपासावा मामलदे या गावाशी आपले जवळचे संबध आहेत. आपण माणूसकी धर्म मानतो तेव्हा जेथे ऋणानुबंध असतात तेव्हा आपण आपुलकीने वागले पाहिजे. याचं उद्देशातून परमेश्वरावर श्रध्दा आहे आपण देखील सहभागी व्हावे या उद्देशाने ऋणानुबंध बळकट राखण्यासाठी, या कार्यक्रमाचे केल्याने यातून आत्मिक समाधान मिळाले असे प्रसंगी छब्बीर पटेल यांनी सांगितले.


No comments