adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन रखडले;गृहकर्ज व इतर हप्ते थकल्याने कर्मचारी हैराण

  आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन रखडले;गृहकर्ज व इतर हप्ते थकल्याने कर्मचारी हैराण काल्पनिक फाईल चित्र  चोपडा (प्रतिनिधी) (संपादक-:- हेमकांत गायक...

 आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन रखडले;गृहकर्ज व इतर हप्ते थकल्याने कर्मचारी हैराण

काल्पनिक फाईल चित्र 

चोपडा (प्रतिनिधी)

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

शासन जनहिताचे अनेक निर्णय घेत असल्याच्या बातम्या सर्वदूर पसरत असतांना वास्तव मात्र वेगळेच आहे.आदिवासी मुला-मुलींच्या जीवनामध्ये बदल व्हावेत म्हणून रात्रंदिवस झटणारे आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी फेब्रुवारी महिना संपत आला तरी जानेवारी महिन्याच्या वेतनापासून वंचित राहिले आहेत.वेतन न झाल्याने  गृहकर्ज,सोसायटी कर्ज आणि इतर हप्ते थकल्याने कर्मचारी वर्ग मेटाकुटीला आला आहे.एक तारखेला वेतन व्हावे ही अनेक संघटनांची आजतागायत मागणी असूनही त्यावर अनेक वेळा शासन दरबारी फक्त चर्चा झाल्या अंमलबजावणी मात्र होईना अशी परिस्थिती आहे.

एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे आदिवासी मंत्री अशोकजी उईके यांनी शाळेची वेळ बदलून विद्यार्थी पालक तसेच कर्मचारी हिताचा निर्णय घेतला परंतु वेतनाच्या बाबतीत असलेली समस्या जुन्या काळात होती तीच आहे.दर महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत वेतन दिले कार्यालयाकडे पाठवले जातात व पुढील महिन्याचा पाच तारखेपर्यंत वेतन करण्याचे बऱ्याच वेळा चर्चिले गेले पण त्यावर अंमलबजावणी झालेली नाही.याकडे देखील नवीन मंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी सर्व कर्मचारी यांनी केली आहे.

No comments