adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

  जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी भरत कोळी -:- यावल ता.प्रतिनीधी (संपादक-:-  हेमकांत गा...

  जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी


भरत कोळी -:- यावल ता.प्रतिनीधी

(संपादक-:-  हेमकांत गायकवाड)

आज दि १९-२-२०२५ रोजी यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य सौ रंजना महाजन मॅडम व इंग्रजी  शाळेच्या प्राचार्य यांनी उपस्थिती दिली. सेमी माध्यमच्या पर्यवेक्षिका  लोखंडे मॅडम व इंग्लिश माध्यमाच्या पर्यवेक्षिका गौरी गिरूड मॅडम यांनी देखील उपस्थिती दिली. मान्यवर व अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.


यानंतर इयत्ता ९ वी सेमी वर्गातील विदयार्थी प्रणव पाटील यांने शिवगर्जना करून सर्वांमध्ये नव चैतन्य निर्माण केले. त्याच बरोबर ५ वी सेमी माध्यमाच्या विद्यार्थीनींनी शिवरायांची आरती गायली

यानंतर शाळेतील शिक्षिका इशा इंगळे मॅडम यांनी छत्रपति शिवरायांबद्दल विदयार्थ्यांना माहिती दीली.शाळेतील विद‌यार्थांचे देखिल यानंतर भाषणे झाली.कार्यक्रमामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी इंग्लिश माध्यमाच्या इयता ६ वी, नव्वी व १ वी तील विदयार्थानींनी शिवाजी महाराजांची माहीती सांगणारे नृत्य आदर केले हया कार्यक्रमाची रूपरेषा पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅम गौरी भिरुड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आखली गेली.हया कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मी कवडीवाले यांनी केले. तसेच आभार प्रदर्श गायत्री चौधरी मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सह सहकार्य लाभले.अशा रितीने शिवजन्मोत्सव शाळेत उत्साहात पार पडला.

No comments