५८ व्या वर्धापन दिन निमित्त स्वातंत्र्य सैनिक शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी करुणा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा प्रतिनिधी रविं...
५८ व्या वर्धापन दिन निमित्त स्वातंत्र्य सैनिक शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी करुणा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
वर्डी ता चोपडा येथील स्वातंत्र्य सैनिक शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यालयाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करुणा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अश्विनी गुजराथी पी डी सी इनरव्हिल क्लब चोपडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्था भुसावळचे अध्यक्ष विनायकराव रामदास चव्हाण हे होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त गट शिक्षणाधिकारी अविनाश पाटील,समर्थ सद्गुरु सुखनाथ बाबा दरबाराचे मठाधिपती भैया दादा महाराज,प्राचार्य डॉ बी एन पाटील,केंद्रप्रमुख राजेश अडवाल,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अशोक सैंदाणे,पोलीस पाटील पद्माकर नाथ आबाश्री,कल्पना महेंद्र पाटील सरपंच वर्डी,अनिता रामलाल बारेला उप सरपंच,विमलबाई भिल,गोपाल पांडुरंग पाटील,एस एन चौधरी,नितीन चौधरी हे होते.उपस्थित मान्यवरांना विद्यालयाचे चेअरमन हरिचंद्र शामराव चव्हाण,संचालक गोपाल रामदास चव्हाण,भरत शामराव चव्हाण,करुणा क्लब सल्लागार भारती मोहन चव्हाण,खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पवार,पर्यवेक्षक आर बी साळुंखे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुणा क्लब चे संरक्षक मोहन चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन एम डी पाटील,व्ही जी चव्हाण यांनी केले.विद्यार्थ्यांच्या सूक्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम हे महत्त्वाचे ठरतात असे प्रतिपादन अविनाश पाटील यांनी केले.तर विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच मैदानी खेळांच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साधावी.तसेच उद्याच्या सोनेरी भविष्याचा पाया शाळा असते. ती विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व घडवते असे अश्विनी गुजराथी यांनी सांगितले.तर करुणा उत्सवाच्या कार्यक्रमातून संपूर्ण गावात आनंदाचे उधान येते.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकराव चव्हाण यांनी केले.कार्यक्रमात करूणा क्लब सदस्य विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक परंपरा,जात्यावरील गाणी,माय भवानी,नाच रे मोरा,तेरी मिट्टी मे मिल जावा,जय श्रीराम बोलेगा,जोगवा,शेतकरी,बेटी पढाओ बेटी बचाओ,पर्यावरण रक्षण,घनकचरा व्यवस्थापन,अंधश्रद्धा निर्मूलन,स्वच्छ भारत सुंदर भारत,वृक्षारोपण,रेन वॉटर हार्वेस्टिंग,स्री सक्षमीकरण अशा विविध विषयावरील नाटिका तसेच देशभक्तीपर गीते,गुजराथी,राजस्थानी,कोळी,आदिवासी इ लोकनृत्य सादर केले.तसेच पाठ्यांशावर आधारित अधेर नगरी चौपट राजा, छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान भेट,तर सांस्कृतिक परंपरांवर आधारित हळदी कुंकू उखाणा इ विनोदी नाटिका सादर करीत प्रेक्षकांना पोट धरून असायला लावले.माध्यमिक विद्यालयातील तीनशे तर प्राथमिक विद्यालयातील दीडशे विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.एकूण चाळीस कार्यक्रम सादर करण्यात आले.गावातील हजारो आबाल वृद्धांनी कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा आनंद द्विगुणीत केला व कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. बाल कलाकारांचे भरभरून कौतुक केले.व शिक्षकांनाही प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी जी पाटील,आर जी पाटील,डी एस पाटील,दीपक वासुदेव पाटील,पी आर पाटील,विवेक चौधरी,भूषण सानप,घन:श्याम निळे,राहुल पाटील,ललित पाटील,मनीषा चव्हाण,वैशाली पाटील,सविता साळुंखे,नागेश्वर सुलताने,हर्षल भदाणे,श्रीम रंजना नामदेव चव्हाण,गौरव पाटील,विलास चव्हाण,दीपक पाटील,सुशीला धनगर,सुरेखा चव्हाण,सखुबाई पाटील,शितल धनगर,अनुसया पाटील,सुंदरबाई पाटील यांनी परिश्रम घेतलेत.



No comments