adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रस्ता अडवुन लुटमार करणा-या चोरटयांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

  रस्ता अडवुन लुटमार करणा-या चोरटयांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) धरणगाव:- तालुक्यातील नांदेड...

 रस्ता अडवुन लुटमार करणा-या चोरटयांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक


धरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

धरणगाव:- तालुक्यातील नांदेड फाटा येथे दिनांक १५/१२/२०२४ रोजी रात्री काही इसमांनी रस्त्यामध्ये अडवुन त्याचेकडील मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली म्हणून धरणगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र ४६०/२०२४ कलम ३०९ (४) व ३(५) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. त्यानुसार गुन्हयातील आरोपीताचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आदेशीत करुन पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे, पोहवा नंदलाल पाटील, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, पोना भगवान पाटील, पोकॉ राहुल कोळी व चालक पोहवा दिपक चौधरी यांचे पथक तयार करण्यात आले होते.मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार नमुद गुन्हयातील आरोपी हा तामसवाडी ता. पारोळा येथील असल्याबाबत माहीती मिळाल्याने वर नमुद पथकाने छापा टाकुन त्यास मुददेमालासह ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव अक्षय ऊर्फ घोडा भिमराव पाटील (बागुल) रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव असे सांगुन त्याने व त्याचे साथीदार अभिजीत भरतसिंग राजपुत रा.वणी मलाणे ता.जि.धुळे , अजय भाईदास थोरात रा.नवलनगर ता.जि.धुळे व संभाजी पाटील रा. सातरणे ता.जि.धुळे यांनी मिळून नांदेड फाटा, ता.धरणगाव येथे तोडांला रुमाल बांधुन एका इसमाकडील मोबाईल फोन, रोख रक्कम व मोटारसायकल जबरदस्तीने काढुन घेवुन पळुन गेले. तरी नमुद आरोपी नामे अक्षय पाटील याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटारसायकल व रोख रक्कम असे मिळुन एकुण २०५२०/- रुपयाचा मुददेमाल हस्तगत करुन त्याला धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, उप विभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग श्री आण्णसाहेब घोलप, मा.श्री. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

No comments