adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सेवानिवृत्त शिक्षकाला मागितली लाच जिल्हापरिषदेचा लेखाधिकारी आठ हजार रुपये घेताना लाचलूचपत विभागाने पकडला रंगेहाथ

  सेवानिवृत्त शिक्षकाला मागितली लाच जिल्हापरिषदेचा लेखाधिकारी आठ हजार रुपये घेताना लाचलूचपत विभागाने पकडला रंगेहाथ  सचिन मोकळं अहिल्यानगर (स...

 सेवानिवृत्त शिक्षकाला मागितली लाच जिल्हापरिषदेचा लेखाधिकारी आठ हजार रुपये घेताना लाचलूचपत विभागाने पकडला रंगेहाथ 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१९):-यशस्वी सापळा कारवाई सदरील घटनेतील तक्रारदार हे शिक्षक असून ते दिनांक ०३/०६/२०२२ रोजी शिक्षकी पेशातून सेवा निवृत्त झाले असून तक्रारदार हे सेवानिवृत्त झाल्या पासून  त्यांना प्रोव्हिडंड फंड आज अखेर मिळालेला नाही.त्याकरीता तक्रारदार हे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग या कार्यालयात काम करणारे आलोसे अशोक मनोहर शिंदे, वय - ४९ ,सहाय्यक लेखाधिकारी, (वर्ग-२) वेतन व भविष्य निर्वाह विभाग,जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,अहिल्यानगर,राहणार तुळसाई पार्कच्या पाठीमागे,गावडे मळा,पाईपलाईन रोड,सावेडी,अहिल्यानगर.यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन पाच सहा वेळेस समक्ष भेट घेतली असता त्यावेळी आलोसे यांनी तक्रारदार  यास म्हणाले की,तुमचे काम खुप जुने असून ते करून देण्यासाठी बक्षीस म्हणून २०,००० रुपये द्यावे लागतील या बाबतची तक्रार दि.१८/०२/२०२५ रोजी ला.प्र.वि.अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती.त्यानुसार दि.१८/०२/२०२५ रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली.लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान  आलोसे यांनी तक्रारदार यांची प्रोव्हिडंड फंडची फाईल पास करण्यासाठी लाचेचा पहिला हप्ता पंचा समक्ष मागणी केली.दि.१८/०२/२०२५ रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग अहिल्यानगर येथे सापळा आयोजित केला असता तक्रारदार यांच्याकडून आलोसे यांनी पंचा समक्ष ८,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.सदर बाबत आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन,जि.अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.तर आरोपीच्या अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू-१) रोख रक्कम रुपये ५१०,२) वन प्लस कंपनीचा मोबाईल असुन आरोपीच्या घरझढतीची प्रक्रिया चालू आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आलोसे यांचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक.यांचे मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी छाया देवरे,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि.अहिल्यानगर. सापळा पथक पोकॉ-सचिन सुद्रुक,पोकॉ-गजानन गायकवाड,पर्यवेक्षण अधिकारी,अजित त्रिपुटे,पोलिस उप अधीक्षक,लाप्रवी,अहिल्यानगर हे पुढील तपास करीत आहेत 

▶️ आरोपी नं.१ यांचे सक्षम अधिकारी संचालक,लेखा व कोषागारे मुंबई

-----------------------------


No comments